पुणे : कोंढव्यात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्यास ठोकल्या बेड्या

उंड्री : कोंढव्यामध्ये अमली पदार्थाची विक्री करणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून दोन किलो 832 ग्रॅम वजनाचा ५६ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आले आहे. निजामुद्दीन शहाबुद्दीन खान (वय 36, रा. भागोदयनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

कोंढव्यामध्ये निजामुद्दीन खान अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा आरोपीला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ 2 किलो 832 ग्रॅम गांजा आढळला असून, त्याच्याकडून 56 हजार 640 रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, विशाल दळवी, संदीप जाधव, रेहाना शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply