आंतरराष्ट्रीय मानदंडांनुसार, भारत अजूनही मुख्यत्वे ग्रामीण देशच आहे. आपली जी शहरे आहेत, तीही शहरी नियोजनाच्या पातळीवर कोलमडून पडण्याच्या मार्गावर आहेत. पावसात रस्ते उखडतात आणि नाले तुंबून वाहू लागतात. शहरात पाणी साचणे ही सामान्य बाब झाली आहे. अनधिकृत वसाहती वाढत आहेत आणि प्रदूषण जीवघेणे बनले आहे. वीज-पाण्याचा पुरवठा अनिश्चित आहे. तसेच उघडे मॅनहोल आणि खड्डे वेळोवेळी निष्पाप लोकांच्या अकाली मृत्यूचे कारण बनत आहेत. आपल्या शहरांत नागरिकांना रोजच या दुःस्वप्नातून जावे लागते. संयुक्त राष्ट्रांच्या शहरीकरणाच्या अंदाजांवर आधारित जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, 2025 मध्ये भारताची 35.7% लोकसंख्या शहरात राहत होती. या तुलनेत चीनने आधीच 66.3% ची पातळी गाठली होती. विकसित देशांशी तुलना केली, तर हा फरक आणखी धक्कादायक आहे : अमेरिकेत हा आकडा 80%, कॅनडात 82%, जर्मनीत 78% आणि ब्रिटनमध्ये 85% आहे. चीन आणि विकसित देशांच्या तुलनेत भारतात शहरीकरण खूपच कमी झाले आहे. पण नागरी पायाभूत सुविधा अत्यंत कमकुवत आहेत. अलीकडेच दिल्लीत पाच मजली पीजी (पेइंग गेस्ट) वसतिगृहाची इमारत कोसळणे, हे याचे एक भयंकर उदाहरण आहे. सुमारे पाच दशके जुनी असलेली ही इमारत कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. प्राथमिक अहवालातून इमारतीची वाईट अवस्था, अनधिकृत दुरुस्तीचे काम आणि देखरेखीसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांचे गुन्हेगारी संगनमत समोर आले आहे. दुर्दैव असे की, एकट्या दिल्लीतच अशा पीजीमध्ये लाखो विद्यार्थी राहतात. हे अपयश केवळ महानगरांपुरते मर्यादित नाही. आपली दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरेही वेगाने शहरीकृत होत आहेत, पण अत्यंत विस्कळीत पद्धतीने. धोरणात्मक दुर्लक्षासोबतच या दुर्दशेचे मूळ व्यापक आणि बेलगाम भ्रष्टाचारातही दडलेले आहे. लाचखोरीची साखळी आता जवळपास संस्थात्मक पातळीवर पोहोचली असून, ती पालिका अधिकारी, पोलिस, कंत्राटदार आणि राजकीय वर्गापर्यंत पसरली आहे. आपण ज्या व्यवस्थेत जगत आहोत, तिथे प्रभावशाली लोकांना क्वचितच गैरसोयीचा सामना करावा लागतो, तर बहुसंख्य सामान्य जनता मात्र यात भरडली जाते. आपण अनेकदा स्मार्ट सिटीज मिशन, डिजिटल गव्हर्नन्स, एआय आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रशासनाबद्दल बोलतो. पण ज्या शहरात मूलभूत नागरी सुविधाच काम करत नाहीत, त्या शहराला ‘स्मार्ट’ म्हणणे थोडे विचित्र वाटते. ‘स्मार्ट सिटी’ म्हणजे अशी नव्हे जिथे सर्वाधिक सेन्सर लागलेले आहेत किंवा जिथे एखादे प्रभावी कमांड सेंटर आहे. स्मार्ट सिटी ती असते, जिथे मूलभूत सुविधा खात्रीशीर काम करतात. जिथे रस्ते सुरक्षित असतात, पाणी पुरवठा नियमित असतो, सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते, कचरा नियमित उचलला जातो. इमारतींची तपासणी होते, वाहतूक सुरळीत असते, जिथल्या हवेत मोकळा श्वास घेता येतो. आपली शहरे राहण्यायोग्य बनवायची असतील, तर आपल्याला मूलभूत सुधारणांपासून सुरुवात करावी लागेल. पहिली सुधारणा आर्थिक क्षेत्रात झाली पाहिजे. आरबीआयने आधीच महानगरपालिकांच्या आर्थिक दुर्बलतेची नोंद घेतली आहे, पण ही स्थिती सुधारण्यासाठी काहीही केले गेले नाही. दुसरे म्हणजे, जीआयएस मॅपिंग, पारदर्शक मूल्यांकन आणि प्रभावी डिजिटल वसुलीच्या माध्यमातून मालमत्ता कर प्रणालीचे संपूर्ण आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. तिसरे म्हणजे, स्पष्ट जबाबदारी निश्चित करावी लागेल आणि त्यासाठी नागरी संस्थांचे स्वतंत्र ऑडिट झाले पाहिजे. प्रत्येक प्रमुख नागरी मालमत्तेची एक डिजिटल ओळख असली पाहिजे. संबंधित एजन्सी, कंत्राटदार, अभियंता, बांधकामाची तारीख, देखभालीचा इतिहास आणि तपासणी अहवाल जाहीर उपलब्ध असला पाहिजे. चौथे म्हणजे, अनेक शहरे आजही महापालिका, विकास प्राधिकरणे, जल मंडळे, परिवहन संस्था आणि राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये अडकलेली आहेत. यात जबाबदाऱ्या विभागल्या गेल्या आणि उत्तरदायित्व कमकुवत झाले आहे. पाचवे म्हणजे, भ्रष्टाचाराचा अत्यंत कठोरपणे सामना करावा लागेल- तत्पर कारवाई, पारदर्शकता, नागरी संस्थांच्या निविदा, कंत्राटे, काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, आणि देखभालीचे कार्यक्रम ऑनलाइन उपलब्ध असले पाहिजेत. व्यवस्था तेव्हाच बदलेल, जेव्हा नागरिक स्वतः संघटित होऊन जबाबदारीची मागणी करतील आणि म्हणतील : आता खूप झाले! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) मूलभूत नागरी सुविधाच काम करत नाहीत, त्या शहराला ‘स्मार्ट’ म्हणणे विचित्र वाटते. ‘स्मार्ट सिटी’ अशी नव्हे जिथे सर्वाधिक सेन्सर आहेत, प्रभावी कमांड सेंटर आहे. स्मार्ट सिटी ती असते, जिथे मूलभूत सुविधा खात्रीशीर असतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

म्हसावद पोलिसांची धडक कारवाई; ₹१०.३७ लाखांचा अवैध दारूसाठा व वाहन जप्त!
कुख्यात ड्रग्ज तस्कर सनी पगारेचा जेलमधील VIDEO व्हायरल; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!
सिंहगड कॉलेजमध्ये NSUIचा अचानक पाहणी दौरा; ‘हजेरी लावून कर्मचारी गायब’चा आरोप!
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




