पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:एकत्र जेवल्याने शांती, प्रेमाचे‎ वातावरण निर्माण होते‎

जीवनात अशांतता येण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु शांतीचे मार्ग‎मर्यादित आहेत. त्यापैकी एक म्हणजे अन्न. अन्न आपल्याला प्रचंड‎शांती देऊ शकते. अन्नामध्ये तीन पैलूंचा समावेश आहे : तयारी,‎वाढणे आणि खाणे. आणि हे योग्य झाल्यास ते पचण्यास सोपे ठरते.‎अन्नाच्या या तीन प्रक्रिया माणसाला शांत करू शकतात. आता‎मानसशास्त्रज्ञांनीही हे मान्य केले आहे की एकत्र जेवणारी कुटुंबे शांती‎आणि प्रेमाचे वातावरण निर्माण करतात. "स्वयंपाकाद्वारे‎कल्याण’(वेल बीइंग थ्रू कुकिंग) असे त्यास म्हटले जाते. एक किंवा‎दोन सदस्य जेवण तयार करत असतील तर आणखी दोन किंवा चार‎जणांनी त्यात सामील व्हावे. जेवण तयार करण्यास मदत करणारे हात‎जितके जास्त तेवढे भोजन आनंददायी होईल. आजकाल एकटे‎खाण्याची प्रवृत्ती वाढली. परंतु भविष्यात अशा लोकांना अस्वस्थ वाटू‎शकते. म्हणूनच सर्व धार्मिक विधींमध्ये अन्नाला खूप महत्त्व दिले‎जाते. आजकाल विधींची रचना खूप क्लिष्ट आहे. कार्यक्रमांची‎सजावट गुंतागुंतीची आहे. अशा परिस्थितीत किमान घरी तरी अन्न‎देवतेचा आदर करावा . ‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *