पंतप्रधान मोदी यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎विश्वनाथ ते रामेश्वरमपर्यंत एक उत्सव‎, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आणि ‘विविधतेत एकता’ यांचे पर्व आहे काशी-तामिळ संगमम‎

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वीच मला सोमनाथच्या पवित्र भूमीवर‎सोमनाथ स्वाभिमान पर्वात सहभागी होण्याची सुसंधी‎मिळाली. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशाच्या‎कानाकोपऱ्यातून लोक सोमनाथला पोहोचले होते. या‎कार्यक्रमादरम्यान माझी काही अशा लोकांशीही भेट‎झाली, जे यापूर्वी सौराष्ट्र-तामिळ संगममच्या वेळी‎सोमनाथला आले होते आणि त्याही आधी काशी-तामिळ‎संगममच्या वेळी काशीलाही गेले होते. अशा‎व्यासपीठांबाबतचा त्यांचा सकारात्मक विचार पाहून मी‎खूप प्रभावित झालो. म्हणूनच मी ठरवले की, या‎विषयावर मी माझे काही विचार मांडावेत.‎

‘मन की बात’च्या एका भागामध्ये मी म्हटले होते की,‎माझ्या आयुष्यात मला तामिळ भाषा शिकता आली नाही‎याचे मला खूप दुःख आहे. हे आपले सौभाग्य आहे की‎गेल्या काही वर्षांपासून आपले सरकार तामिळ संस्कृती‎देशात अधिक लोकप्रिय करण्यासाठी निरंतर प्रयत्नशील‎आहे. हे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेला अधिक‎सशक्त करणारे आहे. आपल्या संस्कृतीमध्ये ‘संगम’‎संकल्पनेला खूप महत्त्व आहे. या दृष्टीनेही काशी-तामिळ‎संगमम हा एक आगळावेगळा प्रयत्न आहे. यामध्ये‎भारताच्या विविध परंपरांमधील अद्भूत ताळमेळ तर‎दिसतोच, पण आपण एकमेकांच्या परंपरांचा सन्मान‎कसा करतो, हे देखील समजते. काशी-तमिळ संगममच्या‎आयोजनासाठी काशी हे सर्वात योग्य ठिकाण म्हणता‎येईल. काशीचा तामिळ समाज आणि संस्कृतीशी अत्यंत‎जवळचा संबंध राहिला आहे. काशी हे बाबा विश्वनाथांचे‎शहर आहे तर तामिळनाडूमध्ये रामेश्वरम तीर्थ आहे. ‎‎तामिळनाडूतील ‘तेनकासी’ला दक्षिण काशी असे म्हटले ‎‎जाते. तामिळनाडूचे महान सुपुत्र महाकवी सुब्रमण्यम‎भारती यांनाही काशीमध्ये बौद्धिक विकास आणि ‎‎आध्यात्मिक जागृतीची अद्भुत संधी मिळाली. येथेच‎त्यांचा राष्ट्रवाद अधिक प्रबळ झाला आणि त्यांच्या‎कवितांना नवी धार मिळाली. अशी अनेक उदाहरणे‎आहेत. वर्ष २०२२ मध्ये वाराणसीच्या भूमीवर‎काशी-तामिळ संगममची सुरुवात झाली होती. त्याच्या ‎‎उद्घाटन समारंभात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले ‎‎होते. तेव्हा तामिळनाडूहून आलेल्या लेखक, विद्यार्थी, ‎‎कलाकार, विद्वान, शेतकरी आणि पाहुण्यांनी‎काशीसोबतच प्रयागराज आणि अयोध्येचे दर्शनही घेतले ‎‎होते. संगमममध्ये नवीन विषय जोडले जावेत. नवीन - ‎‎कल्पक पद्धतींचा अवलंब केला जावा आणि लोकांचा ‎‎सहभाग जास्तीत जास्त असावा हा यामागचा उद्देश होता.‎हा उपक्रम आपल्या मूळ भावनेशी जोडलेला राहूनही‎निरंतर पुढे जात राहावा असा प्रयत्न होता. वर्ष २०२३ च्या ‎‎दुसऱ्या आयोजनात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर ‎‎करण्यात आला, जेणेकरून भाषा हा त्यामध्ये अडथळा‎ठरू नये. याच्या तिसऱ्या आवृत्तीत भारतीय ज्ञान‎प्रणालीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. याचबरोबर‎शैक्षणिक संवाद, सांस्कृतिक सादरीकरण, प्रदर्शने आणि‎चर्चासत्रांमध्ये लोकांचा मोठा सहभाग पाहायला‎मिळाला. काशी-तामिळ संगममची चौथी आवृत्ती २‎डिसेंबर २०२५ रोजी सुरू झाली. या वेळची संकल्पना‎अत्यंत रंजक होती. मला ‘तामिळ करकलम’ म्हणजेच‎‘तामिळ शिका’. यात काशी आणि इतर ठिकाणच्या‎लोकांना तामिळ शिकण्याची एक अपूर्व संधी मिळाली.‎तामिळनाडूहून आलेल्या शिक्षकांनी काशीच्या‎विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अविस्मरणीय बनवला! प्राचीन‎तामिळ साहित्य ग्रंथ ‘तोलकाप्पियम’चा चार भारतीय‎आणि सहा परदेशी भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎या अभियानात सांस्कृतिक एकतेचा संदेश पसरवणारे‎पांड्य वंशाचे महान राजा ‘आदि वीर पराक्रम पांडियन’‎यांना श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण आयोजनादरम्यान‎नमो घाटावर प्रदर्शने भरवण्यात आली. बनारस हिंदू‎विद्यापीठामध्ये शैक्षणिक सत्र, विविध सांस्कृतिक‎कार्यक्रमही पार पडले. काशी-तामिळ संगमममध्ये या‎वेळी ज्या गोष्टीने मला सर्वाधिक आनंद दिला.‎त्यांच्यासाठी हे एक असे अद्भुत व्यासपीठ आहे, यातून‎ते आपली प्रतिभा दाखवू शकतात. संगममव्यतिरिक्त‎काशीची यात्राही संस्मरणीय ठरावी, यासाठी विशेष‎प्रयत्न करण्यात आले. भारतीय रेल्वेने लोकांना‎तामिळनाडूहून उत्तर प्रदेशात नेण्यासाठी विशेष गाड्या‎चालवल्या. या प्रवासादरम्यान अनेक रेल्वेस्थानकांवर,‎विशेषतः तामिळनाडूमध्ये त्यांचा उत्साह वाढवण्यात‎आला. सुंदर गाणी आणि आपापसांतील चर्चेमुळे हा‎प्रवास अधिक आनंददायी झाला. येथे मी काशी आणि‎उत्तर प्रदेशातील माझ्या बंधू आणि भगिनींचे कौतुक करू‎इच्छितो, ज्यांनी काशी-तामिळ संगमम विशेष बनवण्यात‎मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या पाहुण्यांच्या‎स्वागत आणि आदरातिथ्यात कोणतीही कसर सोडली‎नाही. अनेक लोकांनी तामिळनाडूहून आलेल्या‎पाहुण्यांसाठी आपल्या घरांचे दरवाजे उघडे ठेवले.‎पाहुण्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून स्थानिक‎प्रशासनही चोवीस तास कार्यरत होते. वाराणसीचा‎खासदार म्हणून माझ्यासाठी ही अभिमानाची आणि‎समाधानाची गोष्ट आहे. या वेळी काशी-तामिळ‎संगममचा समारोप समारंभ रामेश्वरममध्ये झाला. त्यात‎तामिळनाडूचे सुपुत्र आणि उपराष्ट्रपती सी.पी.‎राधाकृष्णनदेखील उपस्थित होते. त्यांनी आपल्या‎विचारांनी कार्यक्रमाची समृद्धी वाढवली. भारताच्या‎आध्यात्मिक समृद्धीवर भर देताना त्यांनी सांगितले की,‎कशा प्रकारे अशी व्यासपीठे राष्ट्रीय एकात्मता अधिक‎बळकट करतात. शैक्षणिक चर्चा . जनसंवादालाही मोठा‎वावा मिळाला.आपल्या संस्कृतींमधील संबंध अधिक‎दृढ झाले आहेत. वर्षाचा हा काळ प्रत्येक‎देशवासीयासाठी अत्यंत पावन मानला जातो. लोक‎मोठ्या उत्साहाने मकरसंक्रांती, उत्तरायण, पोंगल, माघ‎बिहू यांसारखे अनेक सण साजरे करत आहेत. हे सर्व‎उत्सव मुख्यत्वे सूर्यदेव, निसर्ग आणि शेतीला समर्पित‎आहेत. हे सण लोकांना एकमेकांशी जोडतात, ज्यामुळे‎समाजात सद्भाव आणि एकजुटीची भावना अधिक‎प्रबळ होते. या निमित्ताने मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.‎

QuoteImage

काशी-तामिळ संगममचा खोलवर प्रभाव‎पाहायला मिळाला आहे.याद्वारे सांस्कृतिक‎चेतनेला बळकटी मिळालीच, पण‎शैक्षणिक चर्चा, जनसंवादालाही चालना‎मिळाली. यामुळे आपल्या संस्कृतींमधील‎संबंध अधिक दृढ झाले आहेत.‎

QuoteImage

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *