ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा अनपेक्षित पाऊल उचललेआहे. बंगालच्या पराभूत मुख्यमंत्र्यांनी आपण राजीनामादेणार नसल्याची घोषणा केली आहे. निवडणुकीत मतांचीलूट झाली आणि मतदार याद्यांमधून आपल्या समर्थकांचीनावे वगळण्यात आली, असा त्यांचा आरोप आहे. परंतुसध्याच्या परिस्थितीत सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याइंडिया आघाडीसाठी काम करतील, हे त्यांचे विधान आहे.तर भूतकाळात या आघाडीसोबतचे त्यांचे संबंध डळमळीतराहिले आहेत. एखाद्या लोकप्रिय आणि शक्तिशालीनेत्याच्या पराभवाचा क्षण नेहमीच अतिशय आवेगपूर्णअसतो. 1977 मध्ये जेव्हा सार्वत्रिक निवडणुकांचे निकालयेत होते, तेव्हा निराश झालेल्या इंदिरा गांधींनी त्यांच्यामैत्रीण पुपुल जयकर यांना म्हटले होते- ‘पुपुल, मी हरले.’दोन्ही महिला एकमेकींसोबत शांतपणे बसून राहिल्या. काहीमिनिटांतच त्या वेळच्या जगातील सर्वात शक्तिशालीमहिलांपैकी एक अचानक असुरक्षित झाली होती. बाहेरवाजणारे ढोल-ताशे आता त्यांचे कौतुक करत नव्हते, तरत्यांच्या निरोपाचा उत्सव साजरा करत होते. तर 1977 च्याया निवडणुका स्वतः इंदिरा गांधींनीच तेव्हा आयोजित केल्याहोत्या, जेव्हा देशात अजूनही आणीबाणी लागू होती. उत्तरभारतात त्यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला, इतकेच कायतर त्या स्वतःची जागाही हरल्या. प्रस्थापित परंपरेनुसार,इंदिरा यांनी राजीनाम्याची घोषणा केली आणि त्यानंतरतत्कालीन प्रभारी राष्ट्रपती बसप्पा दानप्पा जट्टी यांच्याकडेराजीनामा सुपूर्द करण्यासाठी पोहोचल्या. मात्र त्यांनी पर्यायीव्यवस्था होईपर्यंत त्यांना पदावर राहण्याची विनंती केली.माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी एकदा म्हटले होतेकी, भारताच्या लोकशाहीच्या असामान्य दृढतेचे एक कारणहेदेखील आहे की निवडणुकांनंतर ती एका सरकारमधूनदुसऱ्या सरकारमध्ये शांततापूर्ण आणि हिंसा किंवाविरोधाविना सुरळीतपणे संक्रमण करू शकते. गुजराल1996 कडे लक्ष वेधत होते. तेव्हा नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सार्वत्रिक निवडणूक हरली होतीआणि वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकारस्थापन झाले होते. पण तेदेखील अवघ्या 13 दिवसांतकोसळले, कारण ते बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरलेहोते. यानंतर देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली संयुक्तआघाडीचे सरकार स्थापन झाले. संसदेत नाट्यमयघडामोडी पाहायला मिळाल्या आणि सत्तेच्या वर्तुळात पडद्यामागे हालचाली सुरू राहिल्या. पण या सगळ्यानंतरही सत्तांतर शांततापूर्ण आणि सुरळीतपणेच झाले. पण असे पहिल्यांदाच घडत आहे जेव्हा एखाद्या मुख्यमंत्र्यानेनिवडणूक हरल्यानंतर पद सोडण्यास नकार दिला आहे.यामुळे एक गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगाल विधानसभेचा कार्यकाळ आज संपुष्टात येत आहे. याचदिवशी मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळही संपुष्टात येईल आणि कायदेशीर तसेच घटनात्मक तज्ज्ञांचे मत आहे की त्यांनापद सोडावे लागेल. जर त्यांनी तसे केले नाही, तर राज्यपाल त्यांना बडतर्फ करू शकतात आणि विजयी पक्षाच्यानेत्याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करूशकतात. इंदिरा गांधींच्या उलट- ज्यांनी त्वरित राजीनाम्याची घोषणा केली होती आणि नंतर जनता सरकारच्या विरोधात पुनरागमनाची लढाई लढण्यात मग्न झाल्या होत्या- ममतायांनी लगेचच आक्रमक भूमिका घेण्याचा पर्याय निवडला आहे. असे नाही की एसआयआर प्रक्रिया राबवण्याच्या पद्धतीवर त्यांचा आक्षेप पूर्णपणे निराधार आहे. घाईघाईत हेपार पाडले गेले आणि त्यामुळे सुमारे 27 लाख मतदारमतदान करू शकले नाहीत, कारण त्यांच्या प्रकरणांचानिपटारा होऊ शकला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांनासांगितले की ते पुढच्या वेळी मतदान करू शकतात. हे उघडआहे की या संपूर्ण प्रक्रियेला अधिक चांगल्या प्रकारेहाताळले जाऊ शकले असते. पण राजीनामा न देऊन ममतायांनी दूरदृष्टी दाखवली आहे की नाही, हे तर काळचठरवेल. हे असे पाऊल आहे, ज्याचे दूरगामी परिणाम होऊशकतात. हे एक अनावश्यक उदाहरण प्रस्थापित करते,कारण यानंतर भविष्यात इतर मुख्यमंत्री (आणि शक्यतोपंतप्रधानही) सहजपणे आपल्या उत्तराधिकाऱ्यासाठी रस्तामोकळा करण्यास नकार देऊ शकतात. भारतासारख्याविशाल देशात निवडणूक प्रक्रियेच्या पावित्र्यावर सातत्यानेप्रश्न उपस्थित होत राहतात आणि जवळजवळ प्रत्येकनिवडणुकीत मतचोरीचे आरोप कोणत्या ना कोणत्यास्वरूपात समोर येत राहतात. पण याच्या विरोधात इतरउपायही उपलब्ध आहेत. 1971 मध्ये राज नारायण यांनी तेव्हा इंदिरा गांधींच्याविजयाला आव्हान दिले होते, जेव्हा त्या त्यांच्या शिखरावरहोत्या. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाने त्यांनानिवडणूक अनियमिततेसाठी दोषी ठरवले होते आणि यालाउत्तर म्हणून इंदिरा यांनी आणीबाणी लागू केली होती.महत्त्वाचे हे आहे की 1971 ते 1975 पर्यंत निर्णय येण्यासाठीचार वर्षे लागली होती. आज विविध संस्थांमधील समतोलआधीच प्रचंड दबावाखाली आहे. देशात वाढती आणि तीव्रहोत चाललेली ध्रुवीकरणाची प्रवृत्ती- जी पश्चिम बंगालनिवडणुकांदरम्यान पुन्हा एकदा समोर आली- यावरआणखी ताण टाकणारी आहे. ममता यांना चांगल्या प्रकारेमाहीत आहे की त्या मुख्यमंत्रिपदी राहू शकत नाहीत. परंतुत्यांनी स्पष्टतः राजकीय कारणांमुळे हे पाऊल उचललेआहे. त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य टिकवूनठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, जे अशा पराभवानंतरस्वाभाविकपणे खचू शकते. कार्यकर्त्यांचे राज्य हीचतृणमूलची ओळख आहे. 2011 मध्ये जेव्हा त्या सत्तेतआल्या, तेव्हापासून ही एक समांतर व्यवस्था म्हणून कामकरत आहे. पण या वेळी भाजपने या रचनेत खिंडार पाडलेआहे. अशा स्थितीत ममता आपल्या समर्थकांना संदेश देतआहेत की त्या इतक्या सहजपणे हार मानणाऱ्या नाहीतआणि पुनरागमन करतील. बंगालचा जनादेश स्वीकार नकरता, त्या स्वतःला भविष्यातील राजकीय लढायांसाठीपुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर ममता चौथ्यांदाही जिंकल्या असत्या तर त्या इंडियाआघाडीच्या नेतृत्वाच्या स्वाभाविक दावेदार ठरल्याअसत्या. पण पराभवातही त्या स्वतःला एका प्रमुख भूमिकेतपाहू इच्छित आहेत- एका हरलेल्या नेत्याच्या रूपात नाही,तर अशा पीडितेच्या रूपात जिच्यावर अन्याय झाला आहे.जरी काँग्रेसने केरळमध्ये विजय मिळवला असला तरी,त्यांना माहीत आहे की 2027-28 मध्ये होणाऱ्यानिवडणुकांमध्ये त्यांच्यासमोर मोठी आव्हाने आहेत. राहुलगांधी यांनी ज्याप्रकारे शेवटच्या क्षणी ममता बॅनर्जी यांनासमर्थन देण्याचे आवाहन केले, तेदेखील याच संदर्भातपाहिले जावे. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे) स्पष्टपणे राजकीय कारणांमुळेउचललेले पाऊल...ममता यांना माहीत आहे की त्यामुख्यमंत्रिपदी राहू शकत नाहीत. परंतुत्यांनी स्पष्टपणे राजकीय कारणांमुळे हेपाऊल उचलले आहे. त्या पक्षाच्याकार्यकर्त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्याचाप्रयत्न करत आहेत, जे अशा पराभवानंतरस्वाभाविकपणे खचू शकते. कार्यकर्ते हाचतृणमूलचा कणा आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




