नागपूर : शिंदे गटाचं टेन्शन वाढलं! अब्दुल सत्तारांपाठोपाठ आणखी एक मंत्री अडचणीत?

नागपूर : राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील मंत्री तसेच नेते हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अडचणीत सापडत आहेत. सुरूवातील उदय सामंत, त्यानंतर अब्दुल सत्तार आणि आता संजय राठोड हे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. आजच्या नागपूर अधिवेशनात महाविकास आघाडीचे नेते संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील सावरगाव येथील जमीन खासगी व्यक्तीला विकली, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी गायरान जमीन विक्री करण्यास मनाई केली असताना देखील संजय राठोड यांनी ही जमीन विकली. याशिवाय वाशिमचे जिल्हाधिकारी आणि मंगळूरपीरच्या तत्कालीन तहसीलदारांनी ही जमीन खासगी व्यक्तीला देता येणार नाही, असं सांगितलं असताना देखील संजय राठोडांनी जमीन विकली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गायरान जमीन वाटपावरून विरोधकांकडून आरोप होत असतानाच अब्दुल सत्तार यांनी माध्यमांपासून दोन हात लांब राहणे पसंद केले आहेत. तर अब्दुल सत्तार नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. मात्र अशात अब्दुल सत्तार यांनी माध्यमांना रात्री उशीरा प्रतिक्रिया दिली.

माझ्यावर झालेले आरोप सभागृहात झाले असल्याने याला उत्तर देखील सभागृहातच देणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. त्यामुळे आता अब्दुल सत्तार उद्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply