राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेतके शरद पवार (Sharad Pawar) हे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शरद पवार बारामतीत असताना त्यांना अस्वस्थ वाटत होतं, त्रास होत होत म्हणून सोमवारी रत्यांना ताडीने पुण्याला हलवण्यात आलं. तेथूल रूबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल करून शरद पवार यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांचं एक पथक सातत्याने त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेऊन होतं. त्यांच्या तब्येतीबद्दल वेळोवेळी माहितीही देण्यात येत होती. दरम्यान आज त्यांच्या प्रकृतीबद्दल नवे अपडेट्स समोर आले आहेत. तसेच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज कधी मिळणार याचीही माहिती समोर आली आहे.
कधी मिळणार डिस्चार्ज ?
सतत येणार खोकला आणि श्वसनास होणारा त्रास यामुळे सोमवारी दुपारी शरद पवार यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर लगेच उपचार सुरू झाले. आता 5 दिवसांच्या उपचारांनंतर शरद पवार यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येऊ शकतं. आज दुपारच्या सुमारास शरद पवार यांना डिस्चार्ज मिळू शकतो, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे आज त्यांना घरी सोडलं जाऊ शकतं. या बातमीमुळे पवार कुटुंबीय आणि शरद पवार यांचे समर्थक, चाहते, पक्षाचे कार्यकर्ते यांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.
पंतप्रधानांनीही केला होता फोन
सोमवारी रुग्णालयात दाखल केल्यावरच शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर त्यांना होत असलेला त्रास आता काही प्रमाणात कमी झाल्याचही डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवारांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. हॉस्पिटलच्या प्रोटोकॉलनुसार शरद पवारांवर उपचार झाले आणि त्यांच्या तब्येतीवर अतिशय बारकाईने लक्षात ठेवण्यात आलं. वेळोवेळी त्यांच्या प्रकृतीचे अपडेट्स, त्यासंबंधी माहिती डॉक्टरांकडून जाहीर करण्यात येत होती. त्यांच्या तब्येतीबददल समजल्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोन केला होता. मोदींनी मंगळवारी सकळी पवारांना फोन केला, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, अशी माहितीि समोर आली होती.
सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं ?
शरद पवार यांच्या तब्येतीबाबत त्यांच्या कन्येकडून, सुप्रिया सुळे यांच्याकडूनही अपडेट देण्यात आली होती. ” बाबांना छातीत संसर्ग झाला असून त्यांना 5 दिवसांच्या अँटीबायोटिक्सचा कोर्स (Antibiotics Course) पूर्ण करावा लागणार आहे. सुदैवाने, इतर सर्व शारीरिक रिपोर्ट्स सामान्य आले आहेत. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभारी आहे,” असं ट्विट त्यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं, तर कालही माध्यमांशी बोलताना त्यांना शरद पवारांच्या प्रकृतीबद्दल विचारल्यावर अँटी बायोटिक्सचा कोर्स सुरू आहे. तो पू्र्ण झाल्यावर घरी सोडण्याबाबत पुढला निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी नमूद केलं होतं. त्यानुसार, कदाचित आज दुपारी शरद पवार यांना घरी सोडलं जाऊ शकतं.
शहर
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
महाराष्ट्र
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगावर धडकण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधींचा 'गनिमी कावा'आकाशवाणी भवनात ठिय्या आणि राजकीय संघर्ष शिगेला
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
- कोल्हापूर: बीआयआर कायद्याचा अध्यादेश मागे घ्या! कोल्हापुरात हजारो साखर कामगारांचा विराट मोर्चा; २२ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा
- सोलापूर: १६ वर्षांचा संसार मोडल्याने पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने केले चक्क गाढविणीशी लग्न
गुन्हा
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!

























Subscribe to my channel



