जळगाव : बसमध्ये सापडलेली एक किलो चांदीची बॅग केली परत

पाचोरा (जळगाव) : पाचोरा आगाराच्या बसमध्ये राहिलेली नगरदेवळा येथील सराफाची 65 हजार किंमतीची एक किलो चांदीची बॅग आगार कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे सापडली. हि बॅग सराफास परत देण्यात आली आहे.

पाचोरा आगाराची जळगांव– पाचोरा बसमधून नगरदेवळा येथील सराफ रोहित सोनार प्रवास करत होते. बसमधून उतरतांना 65 हजार रुपये किंमतीची एक किलो चांदी असलेली बॅग ते बसमध्येच विसरले. घरी येत असताना बॅग बसमध्येच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी आपला मित्र गोलू पाटील यास या संदर्भात माहिती दिली.

गोलू पाटील यांनी पाचोरा आगारातील कर्मचारी प्रयास पाटील यांना याबाबत माहिती दिल्यानंतर प्रयास पाटील यांनी अतिशय तत्परतेने सर्व सूत्र हलवली. सदरची बस आगारात तपासली केली असता त्यांना बसमध्ये बॅग आढळली. त्यात एक किलो चांदी होती. त्यांनी सराफ रोहित सोनार यांना आगारात बोलवून योग्य ती खात्री करून घेतल्यानंतर त्यांना बॅग परत दिली. प्रयास पाटील यांच्या तत्परतेमूळे बॅग परत मिळाल्याने सराफ सोनार यांनी समाधान व्यक्त केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply