चाकण : मनातून खचलेल्या महिलेस सहानुभूती दाखवत त्याने रुमवर नेले अन् बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली

चाकण : चाकण येथील नाणेकरवाडी येथील एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या तक्रारीनूसार संबंधित संशयित आराेपी हा चाकण बस स्थानकात सुरक्षा रक्षक आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी : नाणेकरवाडी येथे रहाणा-या महिलेचे घरात भांडण झाल्यानंतर ती चाकण बसस्थानकात आली. या महिलेला सुरक्षा रक्षकाने सहानुभुती दाखवत स्वत:च्या खाेलीवर नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला.

त्यानंतर संबंधित महिलेने चाकण बस स्थानकाच्या अज्ञात सुरक्षा रक्षकाविरोधात चाकण पोलीसांत बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी चाकण पोलीस संशयित आरोपीचा शोध घेताहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *