
सोलापूर : सोलापूर विमानसेवेच्या मागणीसाठी सुरू झालेले आंदोलन चिघळले आहे. विमानसेवेसाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाच्या चिमणीचा कथित अडथळा ठरत असल्यामुळे चिमणी पाडून टाकण्याचा विषयही प्रलंबित आहे. याच मुद्दय़ावर सिद्धेश्वर साखर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांना लक्ष्य बनवून आंदोलन पेटविले जात आहे.
या घडामोडीत सत्ताधारी भाजपसह इतर सर्व राजकीय पक्षांची भूमिका तटस्थ असतानाच भाजपचे आमदार विजय देशमुख आणि धर्मराज काडादी यांच्यात कुरघोडय़ांचे शीतयुद्ध सुरू असल्याचे दिसून येते. विमानसेवेसाठी सुरू असलेल्या आंदोलनामागचा डाव ओळखून काडादी समर्थकांनी बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाची मागणी पुढे रेटत सिद्धेश्वर साखर बचावासाठी प्रतिआंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे शहर व परिसरातील वातावरण तापले आहे. ५० वर्षांपूर्वी शहरातील होटगी रस्त्यावर दिवंगत नेते मडेप्पा बंडप्पा तथा अप्पासाहेब काडादी यांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याची उभारणी केली होती. वीरशैव लिंगायत समाजासह इतर सर्व घटकांमध्ये दबदबा राहिलेले माजी खासदार अप्पासाहेब काडादी यांच्या पश्चात त्यांच्याच कुटुंबीयांकडे कारखान्याची सूत्रे चालत आली आहेत. त्यांचे पुत्र मेघराज, नातू धर्मराज आणि सध्या पणतू पुष्पराज याप्रमाणे सत्ताकारण सुरू आहे.
प्रामुख्याने वीरशैव लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या सिद्धाराम साखर कारखान्याशिवाय सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर समितीही वर्षांनुवर्षे काडादी घराण्याच्या ताब्यात आहे. ही दोन्ही संस्था वीरशैव लिंगायत समाजाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. लिंगायत समाजाने काडादी घराण्यावर वेळोवेळी विश्वास दर्शविल्यामुळे या दोन्ही संस्थांपुरते तरी लिंगायत समाजात काडादी यांचे नायकत्व कायम राहिले आहे. सोलापूर शहर उत्तरचे सलग चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आलेले भाजपचे आमदार विजय देशमुख हेसुद्धा प्रतिष्ठित अशा देशमुख घराण्यातील आहेत. शहरात भाजपवर त्यांची मजबूत पकड आहे. लिंगायत समाजाचाच प्रभाव राहिलेल्या आणि राज्यात चौथ्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद आमदार विजय देशमुख हे सांभाळत आहेत. ही राजकीय चढती कमान पाहता त्यांची महत्त्वाकांक्षा आणखी वाढली आहे. त्यातूनच संपूर्ण लिंगायत समाजाचे नेतृत्व मिळविण्यासाठी त्यांची सुप्त धडपड सुरू आहे. तर दुसरीकडे धर्मराज काडादी यांनी राजकारणापासून सदैव दूर राहून समाजावर आपला पगडा कायम ठेवला आहे. आमदार विजय देशमुख हे भाजपच्या माध्यमातून राजकारणात यशस्वीपणे वाटचाल करीत असले तरी लिंगायत समाजाचे नेतृत्व मिळत नसल्याची त्यांच्या अंतर्मनात खंत आहे. त्यामुळेच देशमुख आणि काडादी यांच्यात अलीकडे काही वर्षांपासून शीतयुद्ध सुरू आहे.
देशमुख यांच्या निकटच्या मंडळींपैकी काही जण विमानसेवा सुरू होण्याच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनात आघाडीवर आहेत. ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर सुशोभीकरणासह बेकायदेशीर बांधकामप्रकरणी काडादी यांच्यावर फौजदारी कारवाई होण्यासाठी देशमुख यांचे हितचिंतक असलेली मंडळीच पुढे सरसावत आल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांचा बोलावता धनी कोण, ही बाब लपून राहिली नाही.
या पार्श्वभूमीवर होटगी रस्त्यावर जुन्या विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या नावाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू आहे. आंदोलन चालविणारे केतन शहा यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या भेटीप्रसंगी धर्मराज काडादी यांचा थेट नामोल्लेख टाळून गुन्हेगार म्हणून संबोधले. त्यामुळे एरव्ही संयमी असणारे धर्मराज काडादी संतापले. त्यांनी आंदोलनस्थळी येऊन केतन शहा यांना जाब विचारत थेट पिस्तूल काढून दाखविले. त्यामुळे वातावरण तापले असून आंदोलन चिघळले आहे. काडादी यांच्याविरोधात शहा यांनी पोलिसांत अद्यापि फिर्याद दिली नाही. शहा यांच्या पाठीशी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी धावून आले आहेत. तर दुसरीकडे धर्मराज काडादी यांच्या बाजूने सिद्धेश्वर साखर कारखान्याचे सर्व संचालकांसह कामगार आणि सुमारे २७ हजार शेतकरी सभासद एकत्र येऊन प्रतिआंदोलनासाठी पुढे सरसावले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बाजूने प्रतिआंदोलन सुरू आहे. या प्रतिआंदोलनात बोरामणीत दोन हजार एकर क्षेत्रात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचा मुद्दा पुढे आला आहे. आमदार विजय देशमुख हे विमानसेवा प्रश्नावर स्पष्ट भूमिका जाहीर करीत नाहीत. तर दुसरीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीला हात न लावता विमानसेवा सुरू करण्याची सूचना केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, शिवशरण पाटील हे लिंगायत समाजातील आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि विविध संघटना काडादी यांच्या बाजूने आहेत.
शहर
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- महाराष्ट्र: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये भीषण स्फोट; महाराष्ट्राचे दोन सुपुत्र हुतात्मा.
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
गुन्हा
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
- काश्मीर: जोजिला बोगद्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला! काश्मीर ते लडाख आता वर्षभर राहणार जोडलेले; 'ब्रेकथ्रू' पूर्ण.
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?























Subscribe to my channel


