डोंबिवली : शिवसेना डोंबिवली ग्रामीण मधील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याची बातमी आल्यानंतर आता डोंबिवली ग्रामीण मधील पदाधिकाऱ्यांनी एक पाऊल मागे घेत सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे मागे घेतले आहेत.
डोंबिवली ग्रामीण विभागातील 27 गावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत संपूर्ण प्रकार हा गैरसमजातून झाल्याचे मान्य करण्यात आले, येणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून डोंबिवली शहरालगत असलेल्या डोंबिवली ग्रामीण शिवसेना विभागाचा फक्त प्रशासकीय कारभार हा शिवसेना मध्यवर्ती शाखेतून होईल अशी भूमिका जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी मांडल्यामुळे आमच्या पदाचे अधिकार अबाधित असून चुकून आमचा गैरसमज झाल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि उपस्थित इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्य केले. शिवसेनेचे सर्व डोंबिवली ग्रामीण मधील पदाधिकारी पूर्वीप्रमाणेच जोमाने काम करतील अशी ग्वाही वरिष्ठांना देण्यात आली.
२७ गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आल्यानंतर आता शिवसेनेकडूनदेखील प्रशासकीय सोयीचे कारण देत डोंबिवली ग्रामीणचा समावेश डोंबिवली शहर शाखेत करण्याचे आदेश जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी काढले आहेत. या आदेशानंतर नाराज झालेल्या डोंबिवली ग्रामीणच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.तर, राजीनामे देणारे बहुतांशी माजी आमदार सुभाष भोईर यांचे समर्थक असल्याचे शिवसैनिकाकडून सांगितले जात आहे.मात्र या प्रकरणावर कोणीही बोलायला तयार नाही आहेत...
या आदेशानुसार डोंबिवली शहर व डोंबिवली ग्रामिण विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांस सुचित करण्यात येते की, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांपैकी डोंबिवली ग्रामिण विभागातील सर्व गावांचा समावेश प्रशासकीय कामाच्या सोयीकरीता डोंबिवली शहर शाखेच्या माध्यमातून आज दि.१९/०४/२०२२ पासून कामकाज सुरु करण्यांत येत आहे.
आपले दि.19/4/2022 रोजीचे परिपत्रक मिळाले. सदर परिपत्रकानुसार डोंबिवली ग्रामिण मधिल पक्ष संघटनेचा प्रशासकीय कामकाज पत्राच्या तारखेपासुन डोंबिवली शहर शाखेमधुन होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासुन ग्रामिण विभागातील पक्षाचे काम ग्रामिणच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत चालत होता. प्रत्येक विभागातील पदाधिकारी प्रमाणिकपणे आपल्यावरील जबाबदारी निभावत होते. दि.19/4/2022 च्या आपल्या परीपत्रकानुसार पुढे आमच्यावर कोणतीच जबाबदारी नाही हे स्पष्ट आहे. त्या कारणाने कोणतीच जबाबदारी नसेल तर त्या पदांना काही अर्थ नाही म्हणुन आम्ही स्वखुशिने आमच्यावर असलेल्या पक्षाच्या पदांच राजीनामा देत आहे. आपण आजपर्यंत आम्हा सर्वांवर जी जबाबदारी दिलीत. आमच्या कुवतीनुसार आम्ही ती पार पाडण्याचा प्रयत्न केला. कामच्या ओघात काही चुका झाल्या असतील तर त्या पोटात घ्यावी ही आमची नम्र विनंती.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

