औरंगाबाद : पोलिसाकडून पत्नीचा छळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद : पत्नीला माहेराहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत तिचा शारिरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस पती, सहायक फौजदार सासऱ्यासह पाच जणांविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २४ जुलै ते २६ नोव्हेंबर २०२१ या काळात घडल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे.

पोलिस उपअधीक्षकांच्या वाहनाचा चालक अशोक रामचंद्र महाले यांचा मुलगा शुभम अशोक महाले (रा. सुधाकरनगर, पोलिस वसाहत हाउसिंग सोसायटी) याने पत्नीला माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणत तिला मारहाण व शिवीगाळ करून घराबाहेर हाकलून दिले. तसेच पैसे आणल्याशिवाय घरात येऊ नको असे म्हटल्यामुळे विवाहिता माहेरी निघून गेली.
त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये महिला तक्रार निवारण कक्षात विवाहितेने पती शुभम महाले, सहायक फौजदार सासरे अशोक रामचंद्र महाले, दिर सागर अशोक महाले आणि सासुविरुध्द तक्रारी अर्ज दिला होता. मात्र, महिला तक्रार निवारण कक्षात तडजोड न झाल्यामुळे विवाहितेने सातारा पोलिस ठाणे गाठत महाले कुटुंबीयांविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक शंकर शिरसाट करत आहेत.


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *