शिवसेनेची स्थापनाचं झाली ती मराठी माणसाचा आवाज म्हणून. मुंबईत वाढत चाललेला परप्रांतीयांचा जोर, नोकऱ्यांमध्ये मराठी तरुणांवर होणारा अन्याय याच्याविरुद्ध शिवसैनिक रस्त्यावर उतरला. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाने उठलेलं वादळ मुंबईच्या घराघरात जाऊन पोहचलं. शिवसेनेने बघता बघता मुंबई ठाणे महापालिका जिंकली. राजकारणात आपला जम बसवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वातच करिष्मा होता. पण हा करिष्मा त्यांना मुंबईच्या बाहेर ग्रामीण महाराष्ट्रात पोहचवण्यात मात्र कमी पडत होता. मराठी भाषिकांचा मुद्दा मुंबईबाहेर संयुक्तिक नव्हता, त्यामुळे पक्ष फक्त शहरी तोंडवळ्याचा राहिला.
आणीबाणी व नंतरच्या गिरणी कामगार संपाच्या कालावधीत शिवसेनेची वाढच थांबली होती. अखेर बाळासाहेब ठाकरेंनी ठरवलं पक्षाचं पंख मुंबईबाहेर विस्तारायचं. त्यासाठी पहिलं लक्ष्य होतं मराठवाडा.
ऐंशीचं दशक, शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका ठळकपणे मांडायला सुरु केली तेव्हाचा काळ. निजामाच्या राजवटीत झालेल्या जुलमाचा खुणा अंगावर मिरवणाऱ्या मराठवाड्यात शिरण्यासाठी बाळासाहेबांनी अंगावर भगवी शाल ओढली.
मराठवाड्यात आज गावागावांत शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी भारावलेली मंडळी आहेत. शिवसेनेच्या शाखा आहेत. अडचणीच्या वेळेस मदतीला धावून जाणारे शिवसेनेचे कार्यकर्ते पाहायला मिळतात. मराठवाड्यातील शिवसेनेची सुरवात झाली ती औरंगाबाद शहराच्या गुलमंडी येथून.
8 जून 1985 रोजी तरुणांनी एकत्र येऊन गुलमंडीवर शिवसेनेची पहिली पाटी रोवली. जय भवानी, जय शिवाजी म्हणत वाटचाल सुरू झाली. मुंबई, ठाण्यात घुमणारी शिवसेनेच्या वाघाची डरकाळी औरंगाबादेत ऐकायला यायला लागली. गुलमंडीवर सुरू झालेल्या शाखेला चांगला प्रतिसाद मिळाला.बाळासाहेबांच्या विचाराने भारावलेल्या तरुणांची फौज शिवसेनेत दाखल व्हायला लागली तसा संघटनेचा विस्तार झाला. गुलमंडीनंतर पदमपुरा, हमालवाडा करत करत शहराच्या अनेक भागांत शिवसेनेचा भगवा झेंडा आणि पाटी झळकली. गावागावांतून लोक आमच्या गावात शाखा स्थापन करा म्हणत शिवसैनिकांना स्वखर्चाने घेऊन जायचे. १९८५ ते ९० हा पाच वर्षांचा काळ शिवसेना शहराप्रमाणेच खेड्यापाड्यात पोचण्याचा होता.
हिंदूंचे रक्षण हा मुख्य अजेंडा घेऊन मैदानात उतरलेल्या शिवसेनेने १७ जानेवारी १९८६ ला पहिला मोर्चा शहरातून काढला. काळे धंदे बंद करा, मुस्लिमांची गुंडगिरी रोखा, सिल्लेखाना शहरातून हद्दपार करा आणि समान नागरी कायदा लागू करा या मागण्यांसाठीचा हा मोर्चा होता. क्रांती चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असतानाच सिटी चौकात मोर्चावर दगडफेक झाली. दगडाला दगडाने उत्तर दिले आणि जातीय दंगलीचा भडका उडाला. शिवसेनाच आमची रक्षणकर्ती हा विश्वास शहरवासीयांना देण्यात संघटना यशस्वी ठरली. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा ही बाळासाहेबांची मागणी देखील प्रचंड गाजली. राजकीय सुरवात १९८८ च्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना राजकारणात उतरली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाड्यातली पहिली सभा झाली. त्यावेळी प्रथमच शिवसेनेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले.
औरंगाबादच्या राजकीय इतिहासात चमत्कार घडवला तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. आज मराठवाड्यात शिवसेनेचे फक्त ११ आमदार आणि ३ खासदार आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेवर देखील त्यांचं अनेक वर्ष वर्चस्व राहिलं. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे औरंगाबाद येथे सभा घेत आहेत. मशिदीवरील भोंगे हटवा ही मागणी करत त्यांनीही आपली हिंदुत्वाची शाल ओढली आहे. ज्याप्रमाणे शिवसेना औरंगाबादच्या गुलमंडी येथून चंचुप्रवेश करत मराठवाड्याच्या गावागावात पोहचली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचली तोच चमत्कार राज ठाकरेंची मनसे करेल का हे पाहणे रंजक ठरेल.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

