
पुणे : दस्त नोंदणी करताना आकारण्यात येणारे दस्त हाताळणी शुल्क केवळ ‘एसबीआय ई-पे’ या प्रणालीद्वारे भरता येत होते. आता एसबीआयसोबतच सर्व प्रकारचे डेबिट आणि क्रेडिट कार्डाद्वारे हे शुल्क भरता येणार आहे. ही सुविधा राज्यभरात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली.
दस्त नोंदणी करताना किती पाने आहेत, त्यांचा हिशेब करून रोख पैसे द्यावे लागायचे. अनेकदा सुट्टे पैसे नसल्यामुळे हेलपाटे मारण्याची वेळ खरेदीदारावर येत होती. दस्तनोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात प्रतिपान २० रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे दस्तांची पाने जितकी जास्त तितके शुल्क नागरिकांना भरावे लागते. मात्र, अनेक कार्यालयात प्रतिपान शंभर रुपये शुल्क आकारून नागरिकांची लुबाडणूक होते. या पार्श्वभूमीवर हाताळणी शुल्क ऑनलाइन भरण्याची सुविधा सन २०१८ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहर आणि जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यभरात या सुविधेची अंमलबजावणी सुरू झाली होती. मात्र, ही सुविधा केवळ एसबीआयच्या ऑनलाइन प्रणालीपुरतीच मर्यादित होती. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त हाताळणी शुल्क भरण्यासाठी आता सर्व प्रकारची डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरण्याची सुविधा सुरू केली आहे. याबाबत बोलताना नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘वस्तू व सेवा करानंतर (जीएसटी) राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग म्हणून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची ओळख आहे. करोनानंतर राज्यातील सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे करोनापूर्व काळाप्रमाणे सध्या राज्यात दररोज साडेनऊ ते दहा हजार दस्त नोंद होतात. मात्र, दस्त हाताळणी शुल्क भरण्याची सुविधा केवळ एसबीआयच्या प्रणालीद्वारेच भरता येत होती. सर्वच नागरिकांकडे एसबीआयची ही सुविधा असणे शक्य नसल्याने नागरिकांना त्रास होत होता. मात्र, आता सर्व प्रकारच्या डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे दस्त हाताळणी शुल्क भरता येणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दस्त हाताळणी शुल्क भरण्यासाठी केवळ एसबीआय गेटवेचा पर्याय नागरिकांना उपलब्ध होता. मात्र, आता सर्व प्रकारच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डाद्वारे दस्त हाताळणी शुल्क भरता येणार आहे. ही सुविधा सुरू करण्यात आली असून विभागाच्या वतीने जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन देण्याचा प्रयत्न आहे.
शहर
- पुणे: ३२ वर्षे पूर्ण, तरीही लग्न जमेना; नैराश्यातून मावळमधील तरुणाचे टोकाचे पाऊल
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार! १५ जूनपासून 'घंटा नाद' आंदोलन, तर २९ जूनपासून राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन
- मोबाईलचे नेटवर्क अचानक गायब झालेय का? 'सिम स्वॅप फ्रॉड'चे असू शकते हे लक्षण; वेळीच व्हा सावध!
महाराष्ट्र
- पुणे: ३२ वर्षे पूर्ण, तरीही लग्न जमेना; नैराश्यातून मावळमधील तरुणाचे टोकाचे पाऊल
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- नांदेड: सक्षम ताटेच्या मृतदेहाशी लग्न करणारी आंचल सासर सोडून निघून गेली; ताटे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त
- एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार! १५ जूनपासून 'घंटा नाद' आंदोलन, तर २९ जूनपासून राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन
गुन्हा
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- मुंबई: पोलीस दाम्पत्याचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; मानसिक छळ करणाऱ्या पतीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल!
- बार्शी हादरले! शेअर मार्केटच्या नादात उद्ध्वस्त झाला संसार; १.८० कोटींच्या कर्जापायी मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेतला; त्यानंतर स्वतःही संपवले आयुष्य.
- पुण्यात 'फेक' कॉल सेंटरचा पर्दाफाश! ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली दररोज शेकडो लोकांची लाखो रुपयांची लूट; टोळी गजाआड.
राजकीय
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे विलीनीकरण होणार? नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ; मोठ्या निर्णयाचे संकेत!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- NEET-UG २०२६ परीक्षेसाठी NTA चा महत्त्वाचा निर्णय; वेळ आणि प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात दिलासा!
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- गोरखपूर: माणुसकीला काळीमा! आईच्या तेराव्याच्या खर्चावरून मोठ्या भावाने लहान भावावर झाडल्या गोळ्या; तरुणाचा मृत्यू.
























Subscribe to my channel


