
पुणे : उसाला मिळणाऱ्या प्रतिटन एफआरपीत १५० रुपयांनी वाढ केल्याचा केंद्र सरकारचा दावा ही निव्वळ धूळफेक आहे. उसाच्या उतारा दरात (बेस रेट) १० टक्क्यावरून १०.२५ टक्के अशी वाढ केली असल्यामुळे दीडशे नव्हे तर फक्त ७५ रुपयांचीच वाढ शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यातही कारखान्यांनी वाहतूक दरात वाढ केल्यामुळे आणखी कपात होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केलेली १५० रुपयांची वाढ प्रत्यक्षात मिळणार नाही, असा आरोप राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी केला आहे.
कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशी मान्य करून केंद्र सरकारने एफआरपीत १५० रुपयांची वाढ केल्याची घोषणा केली आहे. मात्र साखर उतारा दर १० टक्क्यांवरून १०.२५ टक्के केला आहे. ०.२५ टक्के उतारा दर वाढल्यामुळे प्रत्यक्षात ७५ रुपयांचीच वाढ झाली आहे. दुसऱ्या बाजूला इंधनाचे दर आणि मजुरीचे दर वाढल्यामुळे कारखान्याने वाहतूक आणि ऊसतोडणी खर्च वाढवला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने १५० रुपये वाढ करून केवळ ढोल वाजवले आहेत. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ७५ रुपयांचीच वाढ मिळणार आहे. पुन्हा एकदा केंद्र सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे, असा आरोप राज्यातील शेतकरी संघटनांकडून होत आहे.
मागील वर्षांत रासायनिक खतांचे दर दुपटीने वाढले. मजुरी वाढली आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे शेतीतील मशागती महागल्या आहेत. त्यामुळे ही दरवाढ पुरेशी नाही. साखर उतारा दरात ०.२५ टक्के अकारण वाढ केली आहे, असाही शेतकरी संघटनांचा आरोप आहे. २०१७-१८पर्यंत ९.५ टक्के उसाचा उतारा दर होता, त्या वेळी २५५० रुपये एफआरपी होती. २०१८-१९ला उतारा दर १० टक्के करण्यात आला. त्या वेळी एफआरपी २७५० रुपये होती. आता येत्या गळीत हंगामासाठी २०२२-२३ साठी साखर उतारा दर १०.२५ टक्के करण्यात आला आहे. तर एफआरपी ३०५० रुपये करण्यात आली आहे. उसाचा उतारा दर कमी दाखवून ऊस उत्पादकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सर्वत्र होईल, अशी शक्यता शेतकरी संघटनेने केली आहे.
मुळात पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्याच्या उर्वरित भागात साखर उतारा कमी असतो. त्यामुळे या वाढीव एफआरपीचा फायदा फक्त पश्चिम महाराष्ट्रालाच होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्राला या वाढीव एफआरपीचा कोणताही फायदा होण्याची शक्यता नाही, असेही शेतकरी संघटनांनी म्हटले आहे.
केंद्र सरकार आपण शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र एफआरपी वाढवताना दुसरीकडे उसाचा उतारा रेट वाढवला आहे. त्यामुळे या वाढीव एफआरपीचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. ही निव्वळ धूळफेक आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




