
पुणे : कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलो २० ते २२ रुपये असताना प्रत्यक्षात कांद्याला मिळणारा सरासरी दर ८ ते १० रुपये इतका आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये १५ ऑगस्टपर्यंत कांद्याचा लिलाव किमान २५ रुपयांपासून पुढे व्हावा, अन्यथा १६ ऑगस्टपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बेमुदत कांदा विक्री बंद आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक उत्पादक शेतकरी संघटनेने दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे याबाबत म्हणाले, कांद्याला वर्षांतील बारा-पंधरा दिवसांसाठी चांगला भाव मिळतो. मात्र वर्षांतील इतर दिवसांत कांदा दहा रुपयांच्या आतच असतो. चांगला भाव मिळाला की कांद्याची निर्यात बंदी केली जाते. कांदा आयात केला जातो. कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या जातात. कांद्यावर साठा मर्यादा लावली जाते. विविध प्रकारचे प्रयत्न करून कांद्याचे दर पाडण्याचे काम सरकारकडून होते. मात्र, कांदा उत्पादन करण्यासाठी सरासरी खर्च वीस ते बावीस रुपये खर्च येतो आणि कांद्याचे विक्री सरासरी आठ ते दहा रुपयांमध्ये होते, असे नुकसान शेतकरी किती दिवस सहन करणार.
कांद्याला किमान उत्पादन खर्चाइतका तरी भाव मिळाला पाहिजे, येत्या काही दिवसांत राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा पंचवीस रुपये प्रति किलोपासून विकला गेला पाहिजे. अन्यथा १६ ऑगस्ट पासून राज्यात कांदा विक्री बंद करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. विशेष करून यंदा नाफेडने अडीच लाख टन कांदा खरेदी केला आहे, पण नाफेडनेही शेतकऱ्याचा कांदा दहा ते बारा रुपये प्रति किलोने खरेदी करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीत टाकले आहे.
देशात सर्वाधिक कांदा उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रात कांद्याची विक्री शंभर टक्के बंद झाल्यास देशात कांदाटंचाई निर्माण होऊन सरकारवर दबाव तयार होईल. कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा जास्त दर मिळाला पाहिजे. सरासरी २५ रुपये दर मिळावा, यासाठी कांदा विक्री बंद आंदोलन करण्यात येईल.
– भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.
शहर
- ८२ व्या वर्षीही तरुणांना लाजवणारे आरोग्य! ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; आजवर औषधाशिवाय ठणठणीत!
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
महाराष्ट्र
- ८२ व्या वर्षीही तरुणांना लाजवणारे आरोग्य! ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; आजवर औषधाशिवाय ठणठणीत!
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
गुन्हा
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.

























Subscribe to my channel



