हल्ली मी पाहतो की, कॉलेजमधून बाहेर पडलेले तरुण सूट आणि टायच्या आकर्षणापोटी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत येण्याचा प्रयत्न करतात. पण हळूहळू त्यांना समजते की, इथे असे कोणतेही काम नाही, जे ते स्वतः न करता दुसऱ्याला करायला सांगू शकतील. अचानक ते स्वतःला टेबलवरून पाणी आणि वाइनचे ग्लास उचलताना आणि टेबल साफ करताना पाहतात. त्या वेळी त्यांच्या नजरा टेबलकडे असण्याऐवजी इकडे-तिकडे जास्त भिरभिरताना दिसतात. असे यासाठी होते की, कोणत्याही ओळखीच्या व्यक्तीने किंवा नातेवाइकाने आपल्याला हे काम करताना पाहू नये, असे त्यांना वाटत असते. त्यामुळे तरुणांमध्ये हॉस्पिटॅलिटीला एक ‘कामचलाऊ’ व्यवसाय मानले जाते यात काही नवल नाही. पण ही इंडस्ट्री त्यांना अशी अनेक महत्त्वाची कौशल्ये शिकवते, जी दुसरी कोणतीही इंडस्ट्री क्वचितच शिकवू शकेल. आत्मसन्मानाला धक्का न लावता हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत कसे टिकून राहायचे, असा प्रश्न तुम्ही विचारू शकता. यावर माझे साधे उत्तर आहे - त्यात ‘स्टाइल कोशंट’ जोडा. जपानी मिल्क-बनचेच उदाहरण घ्या. ते गोड, मऊ आणि फोटोजेनिक असतात. ते केवळ जपानमध्येच नव्हे, तर संपूर्ण युरोप आणि अमेरिकेतही खूप यशस्वी आहेत. हे बन वरून सोनेरी तपकिरी आणि आतून ढगांसारखे मऊ असतात. वरवर पाहता ते मुंबईत एखाद्या चौपाटीवरील स्टॉलवर पावभाजीसोबत दिल्या जाणाऱ्या पावांसारखेच दिसतील. पण एखाद्या शेफच्या फोटोजेनिक नजरेतून पाहिले, तर तेच बन त्याच्या बर्गरला ‘कल्ट-बर्गर’ बनवू शकतात आणि त्याची किंमत 300% वाढवू शकतात. मला हाय-एंड केक बनवण्याच्या कलेबद्दल तेव्हा समजले, जेव्हा एका प्रसिद्ध बेकरने अभिनेत्री काजोलसाठी बनवल्या जाणाऱ्या केकवर लिहिला जाणारा हनी इराणी यांचा मेसेज चुकून माझ्या मित्राला पाठवला. काजोलने 5 ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. हनी इराणी या भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि पुरस्कार विजेत्या पटकथा लेखिका (स्क्रीनरायटर) आहेत. त्यांनी यश चोप्रा यांच्या प्रसिद्ध ‘लम्हे’ (1991) चित्रपटासाठी त्यांची पहिली स्क्रिप्ट लिहिली होती आणि सर्वोत्कृष्ट कथेचा फिल्मफेअर पुरस्कारही जिंकला होता. मी माझ्या मित्राला तोच केक मला पाठवण्यास सांगितले आणि विश्वास ठेवा, तो सर्वार्थाने अगदी वेगळा होता. जे रेस्टॉरंट जेवणाला एका लक्झरी अनुभवात बदलू शकतात ते जगात सर्वात जास्त कमाई करतात. अमेरिकेचेच उदाहरण घ्या. तिथे जर तुम्ही एखाद्या हाय-एंड रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेची किंवा रात्री 10:30 वाजेचीच वेळ मिळेल. 1.5 लाख कोटी डॉलरची ही इंडस्ट्री पूर्ण आठवडाभर खचाखच भरलेली असते. आणि इथे मी फक्त अशा लोकांबद्दल बोलत आहे, जे बाहेर जाऊन जेवण्यावर भरपूर खर्च करतात. या लोकांच्या याच समस्येने नवीन ॲप्स, मेंबरशिप क्लब आणि मध्यस्थांना जन्म दिला आहे. हे सर्वजण जेवणावर प्रचंड खर्च करणाऱ्यांना त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटपर्यंत पोहोचवण्यासाठी स्पर्धा करत आहेत. हॉस्पिटॅलिटीमध्ये स्टाइल म्हणजे केवळ तुम्ही काय घालता किंवा जेवण कसे सजवता एवढेच नाही, तर ती तुमच्या भाषेत, देहबोलीत आणि वागण्यातही तितकीच दिसून येते. एखादा तरुण प्रोफेशनल जर साध्या पद्धतीने ‘ओके’ म्हणण्याऐवजी ‘नक्कीच सर, मी याची काळजी घेईन,’ असे म्हणाला, तर त्याचा एक वेगळाच प्रभाव पडतो. टेबलजवळ उभे राहणे, ट्रे उचलणे, खुर्ची ओढणे, मध्येच न थांबवता बोलणे ऐकून घेणे, एकटक न बघता नजर मिळवणे आणि पाहुण्यांकडे पाठ न फिरवता तिथून बाजूला जाणे, या तुमच्या पद्धती एका साध्या सर्व्हिसलाही शानदार बनवू शकतात. तुम्ही एखादा ग्लास उचलत असलात तरी तो तुम्ही फाइव्ह स्टार जेवण वाढताना राखल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेनेच उचलाल, अशी अपेक्षा असते. केवळ नम्रपणे बोलणेच नाही, तर कामात कोणताही संकोच न बाळगता (अपोलोजेटिक न दिसता) आत्मसन्मानाने वावरणे हीदेखील एका हॉस्पिटॅलिटी प्रोफेशनलची ओळख असते. तुम्ही केवळ जेवण वाढत नसून त्यांना एक चांगला अनुभव देत आहात असे पाहुण्यांना वाटले पाहिजे. हाच खरा ‘स्टाइल कोशंट’ आहे. फंडा हा आहे की, हॉस्पिटॅलिटी हा कोणताही कमी दर्जाचा (लो-स्टेटस) जॉब नाही, जो तुम्हाला दुसरी ‘चांगली’ नोकरी मिळेपर्यंत कामचलाऊ म्हणून करावा लागेल. ही अशी इंडस्ट्री आहे, जिथे एखादे साधे कामही असाधारण बारकाईने केले तर ते मौल्यवान बनते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


