इतरांबद्दल मला माहीत नाही, पण माझ्या कुटुंबाला अलीकडेच घरगुती पातळीवर एका समस्येला सामोरे जावे लागले. आमच्या घरात काम करणारी माणसे गावी गेली. दरवर्षीच असे होते, पण त्यांच्या जागी काम करणारी दुसरी व्यक्ती सहजासहजी मिळते. मात्र या वेळी कुणीही मिळाले नाही. यामागे राज्याच्या निवडणुका आणि लग्नसराईचे कारण सांगण्यात आले. तेव्हा माझ्या पत्नीने ‘रुम्बा’ची मदत घेतली- झाडू आणि फरशी पुसण्याचे काम करणारा रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर. त्याचे काम पाहून प्रभावित झाल्यामुळे, मी तो कुणी बनवला याचा शोध घेतला. त्या होत्या 58 वर्षांच्या हेलन ग्रेनर. हेलन 10 वर्षांच्या असताना त्यांनी ‘स्टार वॉर्स’ चित्रपट पाहिला आणि त्यातील ‘आर2-डी2’ या पात्राने त्या खूप प्रभावित झाल्या. तेव्हापासूनच त्यांना रोबोटिक्सची आवड निर्माण झाली. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएट आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स केलेल्या हेलन यांनी प्रसिद्ध ‘रुम्बा’ची सहनिर्मिती केली. 2002 मध्ये तो लाँच करण्यात आला आणि तो पहिला अत्यंत यशस्वी व्यावसायिक घरगुती रोबोट ठरला. आज ‘रुम्बा’ आमच्या खोलीत बसून असतो आणि कामाला लागण्यासाठी आमच्या कमांडची वाट पाहत असतो. त्याने संपूर्ण घराचा नकाशा पाठ केला आहे- अगदी ‘नो-गो झोन’देखील. जिथे त्याला जाण्याची परवानगी नाही. एका सामान्य टू-बेडरूम घरात तो 45 मिनिटांपेक्षा कमी वेळेत, कुणाच्याही देखरेखीशिवाय, केवळ व्हॉइस कमांडवर झाडू मारण्याचे आणि फरशी पुसण्याचे काम करू शकतो. महिलांकडून नेहमीच अशी अपेक्षा केली जाते की, त्यांनी केवळ कुटुंबाचे जेवण आणि कपड्यांचे कामच सांभाळू नये, तर घर स्वच्छ ठेवण्यासह इतर अनेक कामांमध्ये शारीरिक कष्टही करावेत. अशी अनेक कामे होती, ज्यासाठी दररोज तासन्तास मेहनत करावी लागायची आणि त्यामुळे घरगुती जीवन कंटाळवाणे व्हायचे. म्हणूनच अनेक महिला असे शोध लावण्यासाठी प्रेरित झाल्या, ज्यामुळे त्यांचा वेळ वाचू शकेल. सर्वात जास्त कंबरडे मोडणारे काम म्हणजे भांडी घासणे. तशा डिशवॉशिंग मशीन्स आधीपासूनच अस्तित्वात होत्या, पण 1883 मध्ये जोसेफिन कोकरेन यांच्या पतीचे निधन झाले आणि त्या कर्जात बुडाल्या. आधीपासून अस्तित्वात असलेल्या डिशवॉशिंग मशीन्समध्ये ब्रश आणि स्क्रबरचा वापर होत असे, ज्यामुळे स्वच्छता नीट होत नसे आणि क्रॉकरीचेही नुकसान होत असे. ही मशीनही त्यांच्या नोकरासारखाच निकाल द्यायची. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘जर दुसरे कुणी डिशवॉशिंग मशीन बनवणार नसेल, तर मी स्वतः बनवेन.’ त्यांनी अशा मशीनची रचना (डिझाइन) केली, ज्यामध्ये धातूच्या रॅकमध्ये ठेवलेली भांडी धुण्यासाठी मोटरवर चालणारी चाके आणि गरम पाण्याच्या दाबाचा (हॉट-वॉटर प्रेशरचा) वापर केला जात असे. डिसेंबर 1886 मध्ये त्यांना त्यांच्या शोधासाठी पेटंट मिळाले आणि हाच शोध आधुनिक डिशवॉशर्सच्या प्रमाणित डिझाइनचा (स्टँडर्ड डिझाइनचा) आधार बनला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जवळपास प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरातील सर्वात सामान्य सोबती असलेला फ्रिज हीदेखील महिलांचीच देणगी आहे. पूर्वी बहुतेक लोक ‘आइस बॉक्स’ वापरत असत, ज्यातून सतत वितळलेले पाणी काढण्याची समस्या होती. महिलांना अन्न खराब होण्यापासून वाचवण्यासाठी ते शिजवण्याचे आणि साठवून ठेवण्याचे नियोजन करावे लागत असे. खरे तर आज आपण जो इलेक्ट्रिक रेफ्रिजरेटर वापरतो, त्याचे पेटंट 1914 मध्ये फ्लोरेन्स परपार्ट या महिला स्टेनोग्राफरने मिळवले होते. तसे करणाऱ्या त्या पहिल्या महिला नव्हत्या. फ्रेड डब्ल्यू. वुल्फ यांनी 1913 मध्ये इलेक्ट्रिक रेफ्रिजरेटरचे पेटंट मिळवले होते, ज्यात इलेक्ट्रिक रेफ्रिजरेटर आइस बॉक्सच्या वर ठेवला जात असे. मात्र फ्लोरेन्सने याला पूर्णपणे यांत्रिक करून समोरून उघडणारा दरवाजा लावला, ज्यामुळे अन्न ठेवणे आणि काढणे खूप सोपे झाले. विशेष म्हणजे, ज्या काळात महिलांना पेटंट दिले जात नसत, तेव्हा पेनसिल्व्हेनियाच्या थॉमस मास्टर्स यांनी कॉर्न प्रोसेसिंग मशीनचे पेटंट मिळवले, मात्र हा शोध त्यांच्या पत्नी सिबिला मास्टर्स यांनी लावला होता. 1715 पर्यंत हाताने मका दळून त्याचे पीठ बनवणे हे वेळखाऊ आणि कठीण काम होते. म्हणूनच सिबिला यांना असे मशीन बनवण्याची प्रेरणा मिळाली. अशा शेकडो गोष्टी आहेत, ज्या यांत्रिक करण्यात महिलांनी मोठे योगदान दिले आहे. मग ती मार्गारेट ई. नाइट यांची ‘फ्लॅट बॉटम पेपर बॅग मशीन’ असो, सारा बून यांचा उत्तम ‘आयर्न बोर्ड’ असो किंवा मॅरियन ओ ब्रायन डोनोवन यांचे ‘वॉटरप्रूफ डायपर कव्हर’ असो. फंडा हा आहे की, समस्येचा धैर्याने सामना करा, कोण जाणे, पुढचे संशोधक तुम्हीच असाल!
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



