सर्व तंत्रज्ञान कंपन्यांनी एका कलेत प्रभुत्व मिळवले आहे, जी आता त्यांचा व्यवसाय बनली आहे. त्या एखादी गोष्ट तयार करतात आणि मग सामान्य लोकांना पटवून देतात की तिच्याशिवाय ते जगूच शकत नाहीत. याची सुरुवात फेसबुक, इंस्टाग्राम आणि वॉट्सअॅपपासून झाली होती, बरोबर ना? आपल्यापैकी बहुतेक जण यांच्याशिवाय राहू शकत नाहीत, नाही का? वर्गातील विद्यार्थ्याप्रमाणे बोट वर करून ‘मी असा नाही’ असे म्हणू नका. काही लोकांना यांचे व्यसन लागले नसेल, हे मी मान्य करतो. म्हणूनच मी ‘बहुतेक लोक’ असे म्हटले. आता याचे सर्वांत ताजे उदाहरण म्हणजे मेटा प्लॅटफॉर्मचा वैयक्तिक एआय एजंट ‘म्यूज’ होय. एखाद्या सॉफ्ट टॉयच्या गुबगुबीत आवृत्तीसारखा दिसणाऱ्या म्यूजने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अन्यथा, ८ सप्टेंबर २०२६ रोजी अमेरिका आणि कॅनडामध्ये लॉन्च झाल्यानंतर अवघ्या २२ दिवसांत त्याचे ५ दशलक्षांहून अधिक डाउनलोड्स कसे झाले असते? या महत्त्वाच्या टप्प्यामुळे सुरुवातीच्या लॉन्चनंतरच्या डाउनलोडच्या वेगाच्या बाबतीत चॅटजीपीटी, ग्रोक आणि क्लॉड यांनाही मागे टाकत, हे आतापर्यंतच्या सर्वांत वेगाने वाढणाऱ्या एआय अॅप्समध्ये सामील झाले आहे. मेटाने भारतातील त्याच्या अधिकृत लॉन्चची तारीख किंवा कालमर्यादा जाहीर केलेली नाही. म्यूजबद्दल माहिती नसलेल्यांना सांगू इच्छितो की, आमच्या मजकुराला उत्तर देणाऱ्या सामान्य चॅटबॉट्सच्या तुलनेत म्यूज हा एक वैयक्तिक एआय-एजंट आहे, मात्र तो ‘एजेंटिक बिहेविअर’साठी आहे. तो बहु-टप्प्यांची कामे हाताळतो, पार्श्वभूमीत आपोआप काम करतो आणि आमच्या वतीने डिजिटल सेवांशी संवाद साधतो. तज्ज्ञांना वाटते की, म्यूजसोबत तुम्ही शेअर केलेली कोणतीही माहिती तांत्रिकदृष्ट्या मेटासोबत शेअर केली जाऊ शकते. कंपनीचे म्हणणे आहे की, तिचा वापर तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी केला जाणार नाही; मात्र एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी तो केला जाऊ शकतो. हे काही अंशी आपण कॉल सेंटरमध्ये केलेल्या फोन कॉल्ससारखेच आहे, जिथे ऑटोमॅटिक उत्तर देणारी यंत्रणा सांगते की, ‘हा कॉल अंतर्गत वापरासाठी आणि प्रशिक्षणासाठी रेकॉर्ड केला जाऊ शकतो.’ तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन ऑप्ट-आउट करू शकता, पण मेटाचे म्हणणे आहे की काही विशेष परिस्थिती वगळता त्यांचे कर्मचारी अकाउंट्स अॅक्सेस करणार नाहीत. उदाहरणार्थ, कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांच्या विनंतीवरून किंवा वापरकर्त्याने नोंदवलेल्या समस्येच्या संदर्भात. मात्र, वापरकर्त्याचे डिव्हाइस हॅक झाले किंवा खुद्द या सेवेतच सुरक्षा भंग झाला, तर काय होईल, असा प्रश्न तज्ज्ञ उपस्थित करत आहेत. सामान्यतः आपले सोशल मीडिया अॅप्स, ईमेल, दैनंदिन खरेदीसाठीचे लॉगिन आणि खरेदीचे पैसे भरण्यासाठी वापरले जाणारे बँक अकाउंट—या सर्वांचे लॉगिन वेगवेगळे असतात. ते वेगवेगळे असल्यामुळे सुरक्षित असतील, अशी आपण प्रथमदर्शनी अपेक्षा करतो. पण यापैकी एखाद्या किंवा सर्व लॉगिन्सचा अॅक्सेस एखाद्या सेवेला देऊन आपण मोठा धोका निर्माण करत नाही आहोत का? हे अगदी ऑफिसमधील तुमच्या वैयक्तिक सहाय्यकासारखे आहे—ज्याला केवळ तुमच्या बँक खात्याचीच नव्हे, तर पैसे हस्तांतरित करण्याचा पासवर्डही माहीत आहे. त्या वैयक्तिक सहाय्यकाची निष्ठा असूनही, त्याचे मत कदाचित बदलू शकते, अशी अल्पशी शक्यता कायम राहते. त्याचप्रमाणे, म्यूजमध्ये आपल्या सर्व लॉगिनसाठी ‘सिक्युअर क्रेडेन्शियल स्टोअर’ आहे. मेटाचे म्हणणे आहे की याच्या मदतीने एआय-एजंट पासवर्ड न पाहताही त्यांचा वापर करू शकतो. मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की एआय-एजंट अडचणीही निर्माण करू शकतात. एखाद्या ईमेलमध्ये किंवा वेबसाइटवर असे लपवलेले प्रॉम्प्ट असू शकतात, जे बॉट्सना सूचनांकडे दुर्लक्ष करून खासगी डेटा हॅकर्सच्या खात्यांवर पाठवण्यास सांगू शकतात. अमेरिकन इकॉनॉमिक लिबर्टीज प्रोजेक्टचे वरिष्ठ कायदेशीर सल्लागार ली हेप्नर म्हणतात की, निदान एखादा विश्वासार्ह पर्याय उपलब्ध होईपर्यंत, ‘मेटाच्या पूर्वीच्या कामगिरीत असे काहीही नाही, ज्यामुळे ते खासगी माहितीचे व्यवस्थापक किंवा संरक्षक बनतील, असा विश्वास वाटावा.’ म्यूजच्या सुरुवातीच्या वापरकर्त्यांनी खासगी माहिती अनपेक्षितपणे लीक झाल्याचे नमूद केले आहे. टेक समालोचक मॅट रॉब यांनी अलीकडेच सांगितले की, म्यूजने त्यांच्या विक्रीसाठी पोस्ट केलेल्या एका वस्तूची ठरवलेल्या किमतीपेक्षा कमी किंमत संभाव्य खरेदीदाराला सांगितली आणि त्यांना त्यांच्या घराचा पत्ताही दिला. नंतर म्यूजच्या टीमने या गोंधळासाठी रॉब यांच्या अकाउंटमधील गोंधळात टाकणाऱ्या सेटिंग्जना जबाबदार ठरवले. तात्पर्य असे की म्यूजसारख्या अतिसंवेदनशील, तंत्रज्ञानावर आधारित वैयक्तिक डेटा-ट्रॅकिंग प्रणालीचा वापर करण्यापूर्वी, तुमच्या वैयक्तिक माहितीने भरलेल्या कपाटाची चावी नीट सुरक्षित आहे याची खात्री करून घ्या.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: हिंजवडी मेट्रोचे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; बालेवाडीतील मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित!
- पुणे: उभ्या आयुष्यात कधी रक्ताची बाटली दिली नाही अन् त्यांना आमदार करायचं; पुण्यात निकालाआधी शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची भाजप उमेदवारावर जोरदार आगपाखड!
- नाशिक: पंतप्रधान मोदींना जेवढ्या शिव्या देतील, तेवढे ते खड्ड्यात जातील नाशिक दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल!
- मुंबई: "देवेंद्र आबा..." दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी चिमुरडीने पिगी बँकेत साठवलेले पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला केले दान!
महाराष्ट्र
- रायगड: महायुतीत वाद पेटला! सुनील तटकरे मला संपवण्याची सुपारी देण्याचा प्रयत्न करत आहेत; शिंदेसेनेच्या आमदार महेंद्र थोरवेंचा खळबळजनक आरोप!
- पुणे: हिंजवडी मेट्रोचे ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; बालेवाडीतील मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित!
- पुणे: उभ्या आयुष्यात कधी रक्ताची बाटली दिली नाही अन् त्यांना आमदार करायचं; पुण्यात निकालाआधी शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची भाजप उमेदवारावर जोरदार आगपाखड!
- नाशिक: पंतप्रधान मोदींना जेवढ्या शिव्या देतील, तेवढे ते खड्ड्यात जातील नाशिक दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

५० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार? ग्राहक आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये वाद!
स्वारगेट चौकात शिवाई बसला अचानक आग; पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी! 🔥
26 October 2026
देश विदेश
- गोवा: विधानसभा निवडणूक २०२७ आमदार नसलेल्या मतदारसंघांत भाजपची नवी रणनीती, मित्रपक्षांवरील अवलंबित्व घटवण्याचा मास्टरप्लॅन!
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात


























Subscribe to my channel




