एन. रघुरामन यांचा कॉलम:मुलांमध्ये पैशांची समज कशी निर्माण करावी?

गेल्या आठवड्यात इंदूर विमानतळावर मी एका स्नॅक शॉपवर थांबलो. वस्तू पाहतच होतो की एक लहान मुलगा माझ्या शेजारून जाऊन त्याचे आवडते स्नॅक्स घेण्यासाठी पोहोचला. त्याने दोन वस्तू निवडल्या व आईला दाखवण्यासाठी धावला. आईचे उत्तर सरळ होते- ‘पैसे तुझे आहेत, निर्णय तुझाच.’ हे ऐकताच मुलाचा चेहरा पडला. मी बिल भरतच होतो की तो मुलगा परत काउंटरवर आला, दोन्ही वस्तू परत केल्या व हळूच म्हणाला, ‘सॉरी, मला हे परत करायचे आहेत.’ काउंटरवरील मुलगी हसली आणि तिने सामान ठेवून घेतले. मला राहवले नाही, मी त्या आईला म्हणालो- ‘तुम्ही मुलाला पैशांचा खरा धडा चांगल्या प्रकारे शिकवला.’ जर आपल्यालाही मुलांशी पैशांवर बोलायचे असेल, तर तज्ज्ञांच्या मते या पाच पद्धतींनी सुरुवात करता येऊ शकते: 1. पैशांबाबत उघडपणे आणि वारंवार बोला घरात यावर उघडपणे चर्चा होते, तेव्हा मुले पैशांसोबत नाते निर्माण करू शकतात. जे मुले होण्यापूर्वी पैशांवर चर्चा करतात, त्यांची मुले मोठी झाल्यावर खर्चाबाबत अधिक सजग निघतात. 2. मुलांना चुका करू द्या पैशांच्या बाबतीत मुलांकडून चुका होणारच. मध्येच पडून सोडवण्याऐवजी, त्यांना स्वतःची चूक सोडवू द्या किंवा किमान समजू द्या. आणि जर चूक झालीच, तर रागवू नका, यामुळे मूल आतून दुखावले जाऊ शकते. 3. पैशांशी संबंधित निर्णय घ्यायला शिकवा मुलाला थोडी रक्कम द्या. तो ती कशी खर्च करेल हे त्याला ठरवू द्या. तुमचे मत लादू नका. नंतर शांतपणे बसून त्याच्या निर्णयावर चर्चा करा. 4. आर्थिक उद्दिष्टे निश्चित करायला शिकवा मुलासोबत एखादे उद्दिष्ट ठरवा, जसे की सायकल खरेदी करणे. त्याच्या प्रत्येक छोट्या प्रगतीचे कौतुक करा. बचतीची सवय त्याला लवकरच आवडू लागेल. 5. पद्धतींमध्ये कल्पकता आणा मी पाहिले आहे की मुले वारंवार आपल्या गल्ल्यातील पैसे मोजत असतात. यामध्ये त्यांना एक प्रकारची उपलब्धी जाणवते. वारंवार मोजणे त्यांच्यासाठी एक मनोरंजक खेळ बनतो. मॅनेजमेंट टीप : जाहिराती खिशातून एक-एक पैसा काढण्याच्या प्रयत्नात असतात. अशा वेळी पालकांचे प्राधान्य हे असले पाहिजे की त्यांनी मुलांना मनोरंजक उपक्रमांद्वारे पैशांचा धडा शिकवावा, जेणेकरून बचत व बजेटच्या विषयांमध्ये त्यांची आवड आपोआप टिकून राहील.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *