
राहाता : अमृतसर (पंजाब) येथे पोलीस उपनिरीक्षकाचे वाहन स्फोटकांद्वारे उडवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित गुन्हेगारास केंद्रीय गुप्तचर विभाग, पंजाब पोलीस व स्थानिक पोलिसांनी मोहीम राबवत शिर्डीतील एका हॉटेलमधून शुक्रवारी रात्री उशीरा अटक केली. या आरोपीला पंजाब पोलिसांच्या पथकाने शनिवारी विमानमार्गे पंजाबला नेले.
राजिंदरकुमार राजकुमार बेदी (२९, घर क्र. १, हरिके पट्टन, तहसीलपट्टी रस्ता, जि. तरंगतारंग, पंजाब) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अमृतसर येथील रणजित एवेन्यू पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध स्फोटक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. गुन्हा घडल्यापासून पंजाब पोलीस त्याच्या मागावर होते. तो पाकिस्तानच्या आयएसआयया गुप्तहेर संघटनेचा हॅण्डलर असल्याचा व त्याला कॅनडातून निधी पुरवठा होत असल्याचा पंजाब पोलिसांचा संशय आहे.
अमृतसर येथे राजिंदरकुमार, त्याचे साथीदार हरपाल सिंग, फत्यदीपसिंग या आरोपींनी पंजाबमधील पोलिस उपनिरीक्षक दिलबाग सिंग यांच्या चारचाकी गाडीखाली १४ फेब्रुवारी २०२२ रोजी बॉम्ब ठेवून नंतर फरार झाले होते. यातील राजिंदर हा आरोपी मालदीव देशात विमानाने जाण्यासाठी निघाला होता. परंतु त्याचा करोना चाचणी अहवाल नसल्याने विमानाचे तिकीट मिळाले नाही. तो दिल्ली येथून ‘मंगला एक्सप्रेस’ रेल्वेने नांदेड येथे जाण्यासाठी निघाला. परंतु ही रेल्वे नांदेडला न जाता मनमाडपर्यंत असल्याने तो मनमाड स्थानकावर उतरला. तेथे त्याने एका लॉजवर एक दिवस मुक्काम केला. सकाळी एका दुकानातून दोन सिमकार्ड व एक छोटा मोबाईल घेतला. त्यानंतर तो टॅक्सीने शिर्डीत आला. शिर्डीतील हॉटेल गंगा कॉन्टीनेंटलह्ण येथे थांबला. त्यानंतर तो दर्शनासाठी साई मंदिरात गेला. दुपारी दीडच्या सुमारास तो दर्शन करून हॉटेलवर परत आला. याच दरम्यान त्याने मित्राला फोन केल्यानंतर तो पंजाब पोलिसांच्या जाळय़ात अडकला. त्यानंतर केंद्रीय गुप्तचर विभागाचे (आयबी) पुणे येथील पथक व स्थानिक पोलिसांनी त्याला शुक्रवारी ताब्यात घेतले.
गुन्हेगार आश्रयाला..
देशातील दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर साईबाबा मंदिराची सुरक्षा नेहमीच सतर्क असते. मंदिराला दहशतवाद्यांचा धोका असल्याचेही वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगतात. त्यामुळे मंदिर व परिसरात पोलीस तसेच ‘क्युआरटी’ पथकाची सुरक्षा असतानाही पंजाबमधील हा संशयित खलिस्तानवादी आरोपी शुक्रवारी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पुन्हा लॉजकडे जातो, तरीही त्याचा थांगपत्ताही शिर्डी पोलीस, मंदिर सुरक्षा व स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना का लागला नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिर्डीत गुन्हेगारांचे वास्तव्य असते. या गुन्हेगारांना परराज्यातील पोलीस घेऊन जातात नंतरच त्याची माहिती स्थानिक पोलिसांना कळते. गुन्हेगार लॉज, हॉटेलमध्ये खोल्या घेऊन राहतात, त्याची खातरजमा हॉटेल आणि लॉजचालक करत नाहीत.
भ्रमणध्वनी चालू करताच शोध.. राजिंदर बेदी हा आरोपी शिर्डीत असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी त्याचा भ्रमणध्वनी चालू झाल्यावर मिळताच त्यांनी ही माहिती राज्य दहशतवादी पथक तसेच गुप्तचर यंत्रणेला दिली. नंतर त्यांनी याची माहिती स्थानिक पोलिसांना देताच राजिंदरला शिर्डीतील हॉटेलमधून ताब्यात घेऊन पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अटक केलेला राजिंदर बेदी हा खलिस्तानवादी असल्याचा संशय आहे. राज्याचे एटीएस पथक व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिल्यानंतर शिर्डीतील एका हॉटेलमधून त्याला ताब्यात घेण्यात आले. नंतर त्याची माहिती पंजाब पोलिसांना देण्यात आली. आज येथे आलेल्या पंजाब पोलिसांच्या पथकाच्या ताब्यात त्याला देण्यात आले. पंजाब पोलीस त्याला विमानमार्गे घेऊन गेले. पंजाबमधील पोलीस उपनिरीक्षकाचे वाहन स्फोटकांद्वारे उडून देण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्यांच्याविरुध्द दाखल आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

