देशाच्या वायदा बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत असली तर दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात चांगली वाढ पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किंमती ३ टक्क्यांहून जास्त घसरण पाहायला मिळाली आहे. चांदीची किंमत तब्बल २.६५ लाख रुपयांनी घसरली आहे. तज्ज्ञांच्या मते सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ- उतार पाहायला मिळत आहेत. सोने आणि चांदी दोन्ही नवीन मॅक्रो इकोनॉमिक इंडीकेटरच्या शोधात आहेत. जोपर्यंत दोन्ही मौल्यवान धातूंना कोणताही दुसरा ट्रीगर मिळत नाही, तोपर्यंत सोने आणि चांदीच्या किंमतींची अशीच स्थिती राहू शकते. चला तर पाहूयात दिवस अखेर सोने आणि चांदीचे दर किती होते.
सोने सलग दुसऱ्या दिवशी चढेच
चांदीची घसरण सुरु असतानाच सोन्याच्या दरामध्ये वाढ सुरूच आहे. ९९.९ टक्के शुद्ध सोने २,२०० रुपयांनी म्हणजेच १.४ टक्क्यांनी वाढून १,६०,७०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. मागील कामकाजाच्या सत्रात सोने १,५८,५०० रुपये प्रति १० ग्रॅम भावावर बंद झाले होते. ही वाढ ज्वेलर्स आणि गुंतवणूकदारांनी सतत खरेदी केल्यामुळे झाल्याचे सोने व्यापाऱ्यांचे म्हटले आहे. अमेरिकन डॉलर मजबूत असूनही, सोन्याने आपली वाढ कायम ठेवली आहे.
चांदीची मोठी घसरण
चांदीचे दर प्रति किलोग्रॅम २.६४ लाख रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे मंगळवारी चांदीची खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला, मात्र, चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, राजधानी दिल्लीत चांदीचे दर ७,५०० रुपयांनी आणि जवळपास तीन टक्क्यांनी घसरून २.६४ लाख रुपयांवर आले आहेत.
सोमवारी चांदी २,७२,००० रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.जी मंगळवारी आणखी घटून २,६४,५०० रुपये (सर्व करांसहित) राहिली आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते औद्योगिक मागणी मधील सुस्ती आणि जागतिक दबावाच्या कारणामुळे ही घसरण पाहायला मिळत आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे काय ?
आज मंगळवारी सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाली.तर दुसरीकडे व्यापारी नव्या मॅक्रोइकॉनॉमिक संकेतांची वाट पाहात होते. नजीकच्या काळात बाजारात एक ‘कंसोलिडेशन फेज’ राहू शकतो. सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये श्रेणीबद्ध चढ-उतार होऊ शकतात.दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची स्पॉट किंमत १.३७ टक्क्यांनी घसरून ८२.१६ डॉलर प्रति औंस झाली, तर सोने ५,०५२.४३ डॉलर प्रति औंसवर किंचित कमी झाले.
बाजारातील सहभागी अमेरिकेतील प्रमुख किरकोळ विक्री आकड्यांची वाट पाहत आहेत, त्यानंतर आठवड्याच्या अखेरीस अमेरिकेतील बेरोजगारी आणि बिगर-शेती वेतन डेटा बाहेर येईल.ही आकडेवारी बाहेर आल्याने बाजारात अस्थिरता येण्याची शक्यता आहे, कारण ते फेडरल रिझर्व्हच्या आगामी धोरणे आणि व्याजदराची दिशा निश्चित होणार आहे. त्यानंतरच सोने आणि चांदीच्या किंमतीवर पुढील दिशेवर परिणाम होईल असे एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी अँड करन्सी रिसर्च एनालिस्ट, उपाध्यक्ष, जतिन त्रिवेदी यांनी म्हटले आहे.
सावध ऐका पुढल्या हाका !
बुलियन बाजारातील हा चढ उतार पाहाता किंमती आता स्थिर नाहीत हे तर स्पष्ट आहे. एकीकडे घरगुती मागणी सोन्याला आधार देत आहे. तर जागतिक संकेतांचा चांदीवर मोठा दबाव पडला आहे. गुंतवणूकदारांना सल्ला दिला जात आहे की त्यांनी अमेरिकेतील आर्थिक आकड्यांवर नजर ठेवावी कारण येत्या काही दिवसात किंमतीत आणखी मोठा चढ-उतार पाहायला मिळू शकतो.
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




