Sunil Tatkare : गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या. दिवंगत नेते अजित पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र हव्या होत्या, असा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून केला जात होता. परंतु अजितदादा यांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी या विलीनीकरणाला अनुकूल अशी भूमिका घेतलेली नाही. एकीकडे विलीनीकरणाची मुद्द्यावर वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी माझा भाऊच या जगात राहिलेला नाही. दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबतच गेले, असे म्हणत आता विलीनीकरणाचा मुद्दा मागे पडल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. दुसरीकडे अजितदादांच्या विमान अपघाताविषयीही अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि इतर नेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या भेटीमागचं नेमकं कारण काय होतं? याबाबतची माहिती आता समोर आली आहे. खासदार सुनिल तटकरे यांनी या भेटीबाबत सविस्तर सांगितलं आहे.
काय म्हणाले सुनील तटकरे?
सुनील तटकरे यांनी अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी सीबीआयमार्फत केली जावी, अशी मागणी करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितले. या भेटीनंतर तटकरे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी भेटीबाबत बोलताना “मी स्वत: त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार अशा सर्वांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला त्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलं आहे. या पूर्ण प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी आम्ही केलेली आहे. तसं निवेदन आम्ही दिलेलं आहे,” अशी माहिती तटकरे यांनी दिली.
तसेच, निवेदनाची दखल घेत राज्य सरकार उद्या केंद्र सरकारकडे अजितदादांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. तसा पत्रव्यवहार केला जाईल. मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तशी पावलं उचलली जातील, असेही तटकरे यांनी सांगितले. त्यामुळे आता सीबीआयकडे हे प्रकरण गेले तर नेमकी कोणती नवी माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
[embedded content]
शहर
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
महाराष्ट्र
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट

























Subscribe to my channel




