महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396 वी जयंती आहे. राज्यभरात मोठा उत्साह लोकांमध्ये बघायला मिळतोय. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रात्रीपासूनच शिवनेरी गडावर भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे शिवनेरी गडावर पोहोचले. शिवनेरी गडावर शासकीय कार्यक्रमांचा एक थाट बघायला मिळतोय. ढोल ताशाच्या गजर शिवनेरी किल्ल्यावर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा जोजावत जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. किल्ले शिवनेरीवर 396 वी शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे.
शिवाई देवी मंदिरात शिवाई देवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा शासकीय अभिषेक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते संपन्न झाला. शिवजयंतीनिमित्त शिवभक्तांचा मोठा उत्साह गडावर बघायला मिळतोय. फक्त शिवनेरी किल्लाच नाही तर राज्यातील विविध ठिकाणी मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले आहे. कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अनोखी कलाकृती साकार.
422 किल्ल्यांच्या नावांतून उभा राहिला शिवछत्रपतींचा तेजोमय पोर्ट्रेट चित्राचा अविष्कार. संशोधक-कलावंत डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांची दोन दिवसांची परिश्रमपूर्वक कलासाधना. धाराशिव-तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला. तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवत असल्याने या पूजेला महत्त्व आहे. त्यामुळे देवीच्या गाभाऱ्यात सिंहासन पूजा करून शिवअभिषेक करण्यात आला. यानिमित्त तुळजाभवानी मंदिरात शिवभक्तांनी प्रदक्षिणा घालत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला यावेळी महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील मराठा वस्ती परिसरातील मंडळाने घालून दिला नवा आदर्श. मागील 7 वर्षापासून डीजेमुक्त शिवजयंती साजरी करत केला जातोय शिवजागर. डीजेचा खर्च टाळत परिसरातील महिलांना मराठमोळी साडी-चोळीचा पोशाख दिला जातोय भेट. मराठी संस्कृती, परंपरा टीकावी आणि डिजेमुक्त उत्सव साजरा करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. मंडळाच्या या संकल्पनेचे कौतुक संपूर्ण शहरात होत आहे.
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चित्रकाराकडून महाराजांना अनोखे अभिवादन. शिवाजी महाराजांच्या मोहिमेतील विजयानंतरच्या क्षणाचे 5 बाय 8 फुटाचे चित्र साकारले. सोलापुरातील सुप्रसिद्ध चित्रकार नितीन खिलारे यांनी साकारली कलाकृती. शिवाजी महाराज किंवा त्यांचे मावळे जेव्हा एखादा किल्ला जिंकायचे तेव्हा ते त्या किल्ल्याची पाहणी करायचे. नेमका हाच क्षण चित्रकार नितीन खिलारे यांनी आपल्या कॅन्वास वर साकारले आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



