पश्चिम बंगालमधील जयगाव हे देशातील एक सर्वसामान्य शहर आहे. बाजारात लाऊडस्पीकर वाजत आहेत, मंडप सजवले जात आहेत. लोक गप्पा मारत आहेत, हातगाडीवरचे पदार्थ खात आहेत. आणि या गोंधळाच्या मध्यभागी एक छोटेसे प्रवेशद्वार आहे. पासपोर्ट दाखवा आणि ‘खुल जा सिम-सिम’: काहीही न बोलता तुम्ही एका नव्या जगात पोहोचता. भूतान! पर्वतांच्या कुशीत वसलेला एक छोटासा देश, जो आपल्या धुंदीतच रमतो. सीमा ओलांडताच तुम्हाला शांततेची जाणीव होते. सुव्यवस्थित, स्वच्छ, कोणताही गोंगाट नाही. लोक निरोगी दिसतात आणि आनंदीही. हवा तीच, पण वातावरण मात्र नवे. असो, जसजसे आम्ही थिम्फूकडे पुढे जाऊ लागलो, तसतशी हवाही बदलत गेली. झाडांनी आच्छादलेल्या पर्वतांनी डोळ्यांनीच सांगितले, पाहा, याला म्हणतात निसर्ग. आपल्या स्वार्थासाठी आम्ही त्याचा वापर करत नाही. होय, भूतानमध्ये झाडे तोडणे कडक मनाई आहे आणि तेथील लोक ही गोष्ट गांभीर्याने घेतात. खरं तर सुमारे पन्नास वर्षांपूर्वी भूतानच्या शासकांनी ठरवलं की त्यांचा देश धनदौलतीच्या मागे लागणार नाही. कारण केवळ भौतिक सुख म्हणजे खरं सुख नव्हे. जीडीपी वाढवण्यासाठी प्रदूषण पसरवणारे उद्योग उभारावे लागले, नद्यांमध्ये कचरा सोडावा लागला, तर असा विकास आम्हाला मान्य नाही. म्हणून भूतानने एक नवा विचार स्वीकारला : ग्रॉस डोमेस्टिक हॅपिनेस, म्हणजे सकल राष्ट्रीय आनंद. प्रगती होईल, विकास होईल; पण त्याचे मोजमाप केवळ पैशांच्या आधारे केले जाणार नाही. ही संकल्पना जगभरातील लोकांना आवडली, पण इतर कोणत्याही देशाने ती स्वीकारली नाही. का? शेवटी प्रत्येक माणसाला आनंदच हवा असतो ना. पण मुद्दा असा आहे की ‘आनंद’ म्हणजे नेमकं काय, यावर आपली सहमती नाही. जर तुम्हाला सांगितलं की रोज तुम्ही कार्यालयात, शाळेत-कॉलेजमध्ये केवळ तुमचा राष्ट्रीय पोशाखच घालू शकता, तर तुम्ही ते मान्य कराल का? पण भूतानमध्ये हाच नियम आहे. त्याचप्रमाणे सर्वांची घरं बाहेरून सारखीच दिसतात आणि एकाच शैलीत बांधली जातात. आम्ही जेव्हा गाइडला रॉयल फॅमिलीचा राजवाडा दाखवायला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, तिकडे काही विशेष नाही. राजा-राणीही प्रजेप्रमाणेच राहतात. हो, त्यांचे घर थोडे मोठे असेल, पण काही आलिशान राजवाडा नाही. आणि आपल्याकडे? एका बाजूला आकाशाला भिडणाऱ्या इमारती, तर तिथून दिसणारे दृश्य झोपडपट्ट्यांचे. बाहेरच्या व्यक्तीला स्पष्ट दिसते की भूतानमध्ये लोकांमधील सामाजिक उच्च-नीचता कमी आहे आणि गैरव्यवहार-घोटाळ्यांचा मागमूसही नाही. म्हणतात ना, यथा राजा तथा प्रजा. भूतानचे राजे देशवासीयांची सेवा करणे हे आपले कर्तव्य मानतात. दुसरीकडे भारतात प्रजेतील सदस्यच राज्य करतात आणि त्यांचा हेतू स्पष्ट दिसतो. जिथून पैसे कमावता येतील, तिथून कमवा, मग त्यात जनतेचे नुकसान होवो किंवा पर्यावरणाचे. हे खरे आहे की भूतानची लोकसंख्या खूपच कमी आहे—कदाचित मुंबईच्या अंधेरी किंवा दिल्लीच्या लाजपतनगरइतकी. पण तुम्ही तुमच्या परिसराकडेच पाहा, जिथे केवळ १००-२०० कुटुंबे राहतात. तिथे किती लोक शिस्त पाळतात? वाहतुकीचे नियम असोत किंवा घराचा फ्लोअर प्लॅन, नियम तोडताना आपल्याला अजिबात संकोच वाटत नाही. मग आपल्या रस्त्यांवर, आपल्या शहरांमध्ये आणि आपल्या संसदेतही वाद सुरूच राहतात. असहमती वाईट गोष्ट नाही; धोरणांवर प्रश्न उपस्थित होणेही आवश्यक आहे. पण जेव्हा प्रत्येक मतभेदात स्वार्थ मिसळलेला असतो, तेव्हा भरडला जातो तो देश आणि त्यातील सामान्य जनता. आता सर्वांत महत्त्वाचा प्रश्न—भूतानची जनता जगातील सर्वांत आनंदी आहे का? मी अनेक लोकांना विचारले. वेगवेगळी उत्तरे मिळाली. मला असे जाणवले की तिथले बहुतेक लोक चांगले जीवन जगत आहेत आणि समाधानी आहेत. पण तरुण काहीसे निराशही आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून ते बाहेरील जगाच्या झगमगाटाकडे आकर्षित होत आहेत. कदाचित तारुण्य असेच असते—तुमचा जन्म स्वर्गात झाला असला, तरी नरकाची सफर केल्यानंतरच त्याची खरी किंमत जाणवते! असो, भूतानच्या आठवणी मनात साठवून आम्ही सीमेवर पोहोचलो, पासपोर्ट दाखवला आणि भारतात प्रवेश केला. मग एका वेगळ्याच जगात पाऊल ठेवले.
धामधूम, धूळ-घाम. विविधतेतही मोकळेपणाने जगणे. काहीतरी ऊर्जा आहे, काहीतरी वेगळेच आहे.
नमस्ते इंडिया, सुप्रभात! ‘आनंद’ म्हणजे काय? जर तुम्हाला सांगितले की तुम्ही दररोज फक्त तुमचा राष्ट्रीय पोशाखच परिधान करू शकता, तर तुम्ही हे आनंदाने स्वीकाराल का? पण भूतानमध्ये हाच नियम आहे. त्याचप्रमाणे, सर्वांची घरे बाहेरून सारखीच दिसतात आणि ती एकाच शैलीत बांधली जातात. (हे लेखिकेचे स्वतःचे विचार आहेत)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: इंदापुरात मोठी दुर्घटना! महामार्गाच्या कामादरम्यान डबराचा ढिगारा कोसळून ६ मजूर अडकले; चौघांची सुखरूप सुटका
- पुणे: उजनी धरण परिसरातील 'एआय' डेटा सेंटरसह विविध प्रकल्पांना तीव्र विरोध; आमदार रोहित पवार यांचा आंदोलनाचा इशारा"
- नाशिक: सेवानिवृत्तीला अवघे काही तास उरले असताना मनपा आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; स्वीय सचिव व लेखापालसह तिघे अटकेत"
- पुणे: शेतकऱ्यांच्या दुःखात राजकारण नको! संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर दत्तात्रय भरणेंचा स्पष्ट इशारा"
महाराष्ट्र
- जळगाव: खाकी वर्दीचे स्वप्न… जळगाव पोलीस दलाकडून भावी पोलिसांना थेट भरतीचे धडे; भुसावळमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर संपन्न
- पुणे: इंदापुरात मोठी दुर्घटना! महामार्गाच्या कामादरम्यान डबराचा ढिगारा कोसळून ६ मजूर अडकले; चौघांची सुखरूप सुटका
- पुणे: उजनी धरण परिसरातील 'एआय' डेटा सेंटरसह विविध प्रकल्पांना तीव्र विरोध; आमदार रोहित पवार यांचा आंदोलनाचा इशारा"
- नाशिक: सेवानिवृत्तीला अवघे काही तास उरले असताना मनपा आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; स्वीय सचिव व लेखापालसह तिघे अटकेत"
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय



























Subscribe to my channel




