मेघना पंत यांचा कॉलम:विवाह ही दोन प्रौढ व्यक्तींची भागीदारी आहे, हे आपण समजून घ्यायला हवे‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎एखाद्या विवाहित पुरुषाचा मृत्यू होताच काही तासांतच‎इंटरनेटवर हिशेबाचे चोपडे उघडले जाते. तो किती पोटगी‎देत होता? त्याची पत्नी गरजेपेक्षा जास्त मागत होती का?‎घटस्फोटामुळे तो आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला होता का?‎दुसरीकडे, एखाद्या विवाहितेचा मृत्यू झाल्यावर आपण‎अचानक ‘फॉरेन्सिक इकॉनॉमिस्ट’ बनतो. तिच्या कुटुंबाने‎किती हुंडा दिला होता? नवऱ्याची काय मागणी होती?‎तिच्या पालकांनी तिची योग्य ती काळजी का घेतली नाही? पण आपण क्वचितच विचारतो की, इतक्या वेदना निर्माण‎करणारी परिस्थिती नेमकी कोणती होती? भारतात‎विवाहाला आजही दोन स्वतंत्र, सज्ञान व्यक्तींचे नाते कमी‎मानले जाते. त्यापेक्षा कुटुंब, समाज, बँक खाती,‎स्वयंपाकघरे आणि आडनावांचा सामाजिक करार म्हणूनच‎त्याकडे जास्त पाहिले जाते. आपण विवाह करत नाही, तर‎अपेक्षांच्या ओझ्याखाली बांधले जातो.‎ महिलेने नेहमी जुळवून घ्यावे, अशी अपेक्षा असते. तर‎पुरुषाने कुटुंबाचा खर्च उचलावा, अशी अपेक्षा केली जाते.‎आपण चांगले पती-पत्नी आहोत, हे दोघांनाही सिद्ध करावे‎लागते. संसारात महिलेच्या कष्टाला प्रेम मानले जाते, तर‎पुरुषाच्या आर्थिक योगदानाला त्याची जबाबदारी मानले‎जाते. जोपर्यंत महिला मोबदला मागत नाही, तोपर्यंत तिच्या‎त्यागाकडे दुर्लक्ष केले जाते. पुरुषावर पडणाऱ्या आर्थिक‎ओझ्याला महिला लोभी असल्याचा पुरावा बनवले जाते.‎ एखादी महिला १५ वर्षे मुलांचे संगोपन करते. घर सांभाळते.‎पतीच्या करिअरसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाऊन‎स्थायिक होते. सासू-सासऱ्यांची काळजी घेते. स्वतःच्या‎व्यावसायिक आयुष्यातील संधींचा त्याग करते. मग लग्न‎मोडल्यास तिच्या या त्यागाचे आणि निष्ठेचे काय होते?‎लग्नाचे फोटो भिंतीवरून उतरताच तिचे हे योगदान‎मूल्यहीन होत नाही का? पुरुषाला असा विश्वास दिला‎जातो की, त्याची ओळख ही केवळ कमावण्यावर, कुटुंब‎पोसण्यावर व घरातील आर्थिक बाबींवर नियंत्रण‎ठेवण्यावरच अवलंबून आहे. अशा वेळी घटस्फोटामुळे‎जेव्हा त्याची ही ओळख पुसली जाते, तेव्हा काय होते?‎आपल्याला आर्थिकदृष्ट्या शिक्षा दिली गेली आहे,‎भावनिकदृष्ट्या अपमानित केले गेले आहे,‎सामाजिकदृष्ट्या एकटे पाडले गेले आहे, असे त्याला वाटू‎शकते.‎ या दोन्ही गोष्टी खऱ्या असू शकतात. पण एका‎वास्तवाचा स्वीकार करण्यासाठी दुसऱ्याला नाकारण्याची‎गरज नाही. सर्वात सोयीस्कर गोष्ट नेहमी तीच असते, ज्यात‎एखाद्याला खलनायक ठरवले जाते. लोभी पत्नी, निर्दयी‎पती, हुंड्याचे भुकेले सासरचे लोक. कारण, कोणत्याही‎एका व्यक्तीला दोषी ठरवणे हे संपूर्ण व्यवस्थेतील त्रुटी‎समजून घेण्यापेक्षा खूप सोपे असते.‎ भारतात विवाहाचे स्वरूप त्यासंबंधीच्या संस्थांपेक्षा‎कितीतरी पटीने वेगाने बदलत आहे. आज महिला‎कमावतात. वारसा हक्क मिळवतात. छळ करणाऱ्या‎लग्नातून बाहेर पडतात. दुसरीकडे पुरुष मुलांचे संगोपन‎करतात, त्यांची कस्टडी मागतात. जोडपी आधी एकत्र‎येतात, लग्न नंतर करतात. लोक घटस्फोटावर उघडपणे‎बोलत आहेत आणि पारंपारिक स्त्री-पुरुष जबाबदाऱ्या‎नाकारत आहेत. पण आपल्या अपेक्षा अजूनही जुन्याच‎वळणावर आहेत.‎ आपल्याला अशी आधुनिक महिला हवी असते, जी‎पत्नीची पारंपरिक कर्तव्ये पार पाडेल. आपल्याला पुरुषही‎आधुनिक हवा असतो, पण त्याच्याकडे पतीचे पारंपरिक‎विशेषाधिकार असावेत. विवाह आधुनिक असावेत, पण‎त्यात जुने जेंडरआधारित नियम चालत राहावेत. आणि‎जेव्हा या विरोधाभासांचा स्फोट होतो, तेव्हा आपण त्याच‎व्यक्तीला दोषी ठरवतो, जी या विघटनाच्या सर्वात जवळ‎असते. विवाह एका भागीदारीसारखा असायला हवा.‎कदाचित आपले कायदे, कुटुंबे, समाज आणि अपेक्षांनीही‎यानुसार बदलण्याची गरज आहे.‎ (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *