
मुंबई: ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचाबालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेतील ६७ नगरसेवक पैकी ६६ नगरसेवकांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन बंगल्यात जाऊन भेट घेतली. ६६ माजी नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये माजी महापौर नरेश मस्के समवेत या नगरसेवकांंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
६७ नगरसेवकांपैकी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे या मात्र शिवसेनेतच राहिल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट आता अशी दुफळी ठाण्यात निर्माण झाल्याचे चित्र या भेटीमुळे दिसून येत आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजप-शिंदे गट एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेतील या बंडमुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. राज्यातील पदाधिकारी शिंदे गटात सामील होत असल्याचे दिसत आहे.
ठाण्यातील नगरसेवकांनी काल एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटप ठरलं
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपची सत्ता स्थापन झाली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, नव्या सरकारमध्ये कोणाला किती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. असं असतानाच भाजप आणि शिंदे गटात खाते वाटप कसं होणार याची मोठी माहिती साम टिव्हीच्या हाती लागली आहे.
नव्या सरकारमध्ये लवकरच खाते वाटप होणार असून 28 खाते हे भाजपकडे तर 15 खाती ही शिंदे गटाला मिळणार असल्याची माहिती आहे. गृह महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, उच्च आणि तंत्रशिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास, ओबीसी विकास ही पदे भाजपकडे असतील.
तर शिंदे गटाकडे नगरविकास, खाणकाम, वाहतूक, पर्यावरण, रोजगार हमी, फलोत्पादन, शालेय शिक्षण, मृदा व जलसंधारण, उद्योग मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. या 40 आमदारांपैकी कोणत्या कोणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता लागून आहे.
शहर
- नवी मुंबईत युतीमधील संघर्ष पेटला! शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गणेश नाईकांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न; राजकीय वातावरण तापले
- विराट कोहली 'अहंकारी' आहे का? रवि शास्त्रींनी सांगितले किंग कोहलीच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचे सत्य; केले मोठे खुलासे!
- एसटी बस अनधिकृत ठिकाणी थांबवली तर खबरदार! कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापणार दंड, महामंडळाचा मोठा निर्णय
- शिर्डीत बोगस बाबा गजाआड; अघोरी विद्येच्या नावाखाली दाम्पत्याची ५१ हजारांची लूट!
महाराष्ट्र
- नवी मुंबईत युतीमधील संघर्ष पेटला! शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गणेश नाईकांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न; राजकीय वातावरण तापले
- विद्युतीकरण पूर्ण होऊनही मिरज–कोल्हापूर मार्गावर डिझेलचा धूर; प्रवाशांची आधुनिक 'मेमू' ट्रेनसाठी मागणी!
- एसटी बस अनधिकृत ठिकाणी थांबवली तर खबरदार! कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापणार दंड, महामंडळाचा मोठा निर्णय
- Fraud in Sangli: Man Duped of Rs 9 Lakhs on Pretext of Providing Industrial Fuel
गुन्हा
- पालघर: सरकारी महिला कर्मचाऱ्यावर भररस्त्यात कोयत्याने ८ वार; आरोपी गजाआड, धक्कादायक कारण समोर
- पुणे: एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली ४० हून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक; हायटेक ठग अरविंद आरोगोंडाला पुणे पोलिसांकडून अटक.
- अकोला:भीषण हत्याकांडाने खळबळ; पूर्ववैमनस्यातून २९ वर्षीय अंकुश गवळीची चाकूने भोसकून हत्या.
- तुरुंग निरीक्षकाचा घरात आढळला मृतदेह; पत्नीचे महासंचालकांवर (DGP) मानसिक छळाचे गंभीर आरोप
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- 'मी तुमच्या मुलीला मारलंय'; पतीने केली 'सिक्रेट वाईफ'ची निर्घृण हत्या; इन्स्टाग्राम स्टोरीवरून उघड झाले सत्य!
- कापूस आयात शुल्कातील ११ टक्के कर रद्द; ऑक्टोबरपर्यंत दरात स्थिरता राहण्याची शक्यता.
- बंजी जम्पिंगचा थरार अंगलट; सुरक्षा दोर बांधायला विसरल्याने तरुणीचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल.

























Subscribe to my channel



