
मुंबई : राज्याच्या राजकारणात वादळ उठवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अॅक्टिव्ह मोडमध्ये आले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 'लोकांचा नाथ एकनाथ' अशा आशयाचे बॅनर शिंदे समर्थकांनी झळकवले होते. आता खरंच एकनाथ शिंदे सामान्यांसाठी लोकनाथ झाले आहेत का ? असा प्रश्नही राजकीय पटलावर उपस्थित केला जात आहे. पण, बिहारमध्ये झालेल्या एका घटनेत शिंदे यांनी केलेल्या समाजकार्याचे (social work) कौतुक केले जात आहे. बिहार येथे एका दुर्घटनेत जखमी झालेल्या मराठी कुटुंबाला तातडीनं उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आले. या कुटुंबाला पुण्यात दाखल करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वखर्चाने विशेष विमानाची सुविधा दिली. त्यानंतर बिहारच्या स्थानिक मराठी नागरिकांनी 'शिंदे साहेबांना मानलं' अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील खटाव तालुक्यातील गुरसाळे येथे राहणारे अमोल जाधव यांचे कुटुंब बिहारमधील पाटणा येथे उदरनिर्वाह करत होते. शनिवारी मध्यरात्री २ वाजता जाधव यांच्या राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट झाला. या स्फोटात कुटुंबातील चार जण मोठ्या प्रमाणात भाजले. त्यानंतर जखमींना उपचारासाठी पाटणाच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, पुढील उपचारासाठी रुग्णांना पुणे किंवा मुंबईच्या रुग्णालयात दाखल करावे लागेल, असं तेथील डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी पुण्यात जाण्याचा निर्णय घेतला आणि एअर अॅम्ब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
परंतु, एअर अॅम्ब्युलन्स कंपनीने एका वेळी एकच रुग्ण नेण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर नातेवाईक हतबल झाले. हवाई वाहतुकीचा होणारा लाखोंचा रुपयांचा खर्च परवडणारा नसल्याने त्यांना मोठी चिंता वाटू लागली.त्यानंतर त्यांनी नातेवाईकांकडे मदतीसाठी विनंती केली. पण त्यांच्या मदतीसाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. त्यानंतर प्रचंड मानसिक तणावात असलेल्या जाधव कुटुंबीयांनी आमदार अनिल बाबर यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला. सदर कुटुंबीयांनी घडलेल्या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.
त्यानंतर या घटनेची तातडीनं दखल घेत खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया संपर्क केला. तात्काळ शासकीय एअर अॅम्ब्युलन्स मिळण्यासाठी सिंधियांकडे विनंती केली. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शासकीय एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. वेळ अतिशय कमी असल्याने शिंदे यांनी स्वखर्चातून दोन एअर अॅम्ब्युलन्स बुक केल्या. त्यानंतर त्या कुटुंहबाला तातडीनं पुण्यात दाखल करण्याचे आदेश शिंदे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना दिले.
जखमी झालेल्या ११ वर्षांच्या मुलाला घेवून आज सकाळी सहा वाजता विशेष विमान पुण्यातील लोहगाव विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर दुसऱ्या १२ वर्षांच्या रुग्णाला दुसऱ्या विमानाने सकाळी ११ वाजता पुण्यात दाखल करण्यात आले. शिवसेना वैद्यकीय मदत समन्वयक राजाभाऊ भिलारे व युवराज काकडे यांच्या सहाय्याने पुण्यातील सूर्या सह्याद्री रुग्णालयात रुग्णांना दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
आमच्याकडे शब्द नाहीत. माणसात देव असतो, हे आज आम्हाला समजले. नाव,गाव,पत्ता,ना ओळख,ना कोणाची शिफारस,काहीही माहिती नसताना साहेबांनी आम्हाला मदत केली. मदतीसाठी आम्ही खूप लोकांना विनंती केली पण मदत होऊ शकली नाही. परंतु शिंदेसाहेब आमच्या मदतीला धावून आले. आज आम्ही एकनाथ शिंदे यांच्या रूपाने साक्षात विठ्ठल पाहिल्याची भावना रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करत होते. तसेच मुलं बरी झाल्यानंतर त्यांना घेऊन शिंदे साहेबांना भेटणार असल्याची भावना रुग्णाच्या आईने व्यक्त केली.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




