मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचे नॉट रीचेबल झाले आहेत. बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, संतोष धुरी हे सगळे प्रमुख नेते नॉट रीचेबल असून त्यांचे मोबाईल फोन स्विच ऑफ (बंद) येत आहेत. सोबतच पोलिसांनी मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला चांदीवलीतून अटक केली आहे. राज ठाकरेंच्या आवाहनानंतर पोलिसांकडून ही पहिली कारवाई करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी मशीदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केल्यानंतर ज्या मनसैनिकाने पहिल्यांदा हनुमान चालीसा लावण्यात आली त्या मनसैनिकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मनसेचे चांदीवली विभागाध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच त्यांच्या ऑफिसमधून अनेक भोंगे जप्त करण्यात आले आहेत. घाटकोपर-चिरागनर पोलिसांकडून बर्वे नगर स्मशानभूमीतून भानूशाली यांना अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मनसेचे महत्वाचे नेतेही सध्या नॉट रीचेबल असून मनसेचा एकही नेता फोन घेत नाही.
औरंगाबाद येथील मनसेच्या सभेत प्रक्षोभक भाषण केल्याच्या संदर्भात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सभा घेण्यापूर्वी पोलिसांनी घातलेल्या १६ अटींपैकी १२ अटींचे उल्लंघन या सभेत झाल्याचे सूत्रांकडून समजते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी संध्याकाळी औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. या सभेपूर्वी पोलिसांनी १६ अटी घातल्या होत्या. त्यानंतरच राज यांच्या सभेला परवानगी दिली होती.
राज यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याचे पडसाद मुंबईत उमटू नयेत किंवा राज यांनी दिलेल्या अल्टीमेटममुळे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून राज ठाकरे यांनाही पोलीस १४९ अंतर्गत नोटीस बजावू शकतात, असे सांगण्यात येत आहे.
शहर
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- मुंबई-गोवा महामार्ग: ३१ मे ची डेडलाईन उलटूनही काम अपूर्णच; प्रवाशांची गैरसोय कायम!
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
- मान्सूनची पाऊले वेगवान! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी!
महाराष्ट्र
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- सीएमआर ग्रीन टेक'चा आयपीओ आजपासून खुला; ६३१ कोटींच्या संधीसह ग्रे मार्केटमध्ये ३३ टक्क्यांची दमदार तेजी!
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
गुन्हा
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
- उत्तराखंडमध्ये पर्यटनाचा थरार! नोएडाचा इंजिनिअर आणि रामनगरची तरुणी ट्रॅकिंगदरम्यान बेपत्ता; शोधमोहीम सुरू.
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?


























Subscribe to my channel



