भुवनेश्वरच्या ‘त्या’ पहिल्या षटकामुळे जडेजाला का मिळाला दिलासा?

नवी मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या आयपीएल (IPL 2022) हंगामातील 21 व्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) गुजरात जायंटचा 8 विकेट्सनी पराभव केला. सलग तीन सामने जिंकणाऱ्या गुजरातचा विजयी रथ सनराईजर्स हैदराबादने रोखला. मात्र सनराईजर्स हैदराबादची सामन्याची सुरूवात फार काही चांगली झाली नव्हती. हैदराबादचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने   (Bhuvneshwar Kumar)पहिल्याच षटकात 17 धावा दिल्या.

नाणेफेक जिंकून सनराईजर्स हैदराबादने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिलेच षटक टाकण्यासाठी कर्णधार केन विल्यमसनने चेंडू अनुभवी भुवनेश्वर कुमारच्या हातात दिला. मात्र त्याला चांगली सुरूवात करता आली नाही. त्याने पहिल्याच षटकात 17 धावा दिल्या. विशेष म्हणजे सनराईजर्स हैदराबादच्या गोलंदाजाने पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर नोंदवला गेला आहे. याचबरोबर यंदाच्या हंगामातील डावाच्या सुरूवातीला टाकण्यात आलेले सर्वात महागडे षटक म्हणून भुवनेश्वर कुमारचे हे षटक नोंदवले गेले.

भुवनेश्वर कुमारने या षटकात दोन वाईड चेंडू सीमापार गेले. त्यामुळे या दोन्ही चेंडूवर प्रत्येकी 5 अशा 10 धावा नोंदवल्या गेल्या. आयपीएलमध्ये वाईडद्वारे सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी हे रेकॉर्ड रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि मोहम्मद सिराज (प्रत्येकी 10 धावा) यांच्या नावावर होता. मात्र भुवनेश्वरने पहिल्याच षटकात तीन वाईड चेंडू टाकल्याने या षटकात भुवीला तब्बल 9 चेंडू टाकावे लागले.

जरी भुवनेश्वरने पहिल्याच षटकात वाईडचा विक्रम केले असला तरी कर्णधार केन विल्यमसनने त्याच्यावर विश्वास दाखवून त्याला सामन्याचे तिसरे षटक टाकण्यासाठी पाचारण केले. याच षटकात भुवनेश्वरने शुभमन गिलला बाद करत गुजरातला पहिला धक्का दिला. राहुल त्रिपाठीने गिलचा अप्रतिम कॅच पकडला. पहिल्या खराब षटकानंतर भुवीने पुढच्या 3 षटकात 20 धावा देऊन दोन विकेट घेतल्या.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply