वसुंधरेचे शोधयात्री हे भन्नाट पुस्तक लिहिणाऱ्या डॉ. अनुराग लव्हेकर यांचे 'पुस्तके साद आणि दाद' हे पुस्तकावरचे पुस्तक आले आहे. ॲलिस अल्बिनिया यांच्या Empires of Indus मध्ये लेखिका जसजशी नदीच्या मुखापासून उगमाकडे जाते तसतसा कथेचा प्रवाह वर्तमानकाळ, नजीकचा भूतकाळ, प्राचीनकाळ असा जातो. 'साद आणि दाद' हे पुस्तकही या निरीक्षणाला अंगीकारून कल्पकतेने लिहिल्याचे वाटते. पुस्तकातल्या पहिल्या बारा प्रकरणांचा क्रम बघता तो श्रीकृष्णदेवराय-पूर्व काळापासून म्हणजे साधारण इसवीसनाच्या १३ व्या शतकापासून ते १९९३च्या किल्लारी भूकंपासंदर्भापर्यंत क्रमाक्रमाने येतो. यात सुशील अत्रेंचे हम्पी विजयनगर, व्यंकटेश देवनपल्लींचे राजाधिराज श्रीकृष्णदेवराया, वा. गो. आपटे आणि यशोधन जोशी लिखित (नागपूरकर) मराठ्यांचा दरारा ते आपण स्वातंत्र्योत्तर काळातल्या शेषराव मोरे यांच्या गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी, साहना विजयकुमार यांच्या १९८०-९० मधले काश्मीर दाखवणार्या कशीर, मनोज कुलकर्णी लिखित ९३ च्या किल्लारी भूकंपाशी निगडीत चिगूर कादंबरीपर्यंत आपण येऊन पोहोचतो. पुस्तकातले शेवटचे ३७ वे प्रकरण फरीद झकेरिआ यांच्या फ्यूचर ऑफ फ्रीडमवर आहे. ते वाचकाला भविष्याविषयी विचार करण्यास भाग पाडत कालक्रमावरही कळस चढवते. त्यामुळे हा केवळ समीक्षाग्रंथ न राहता एक साहित्यकृती म्हणून मिरवतो. अनुराग लव्हेकर हे पेशाने डॉक्टर आहेत. उपचार पद्धती ठरवताना डॉक्टरला आधी केलेल्या उपचारांचे परिणाम ताडून नवी, वेगळी आणि पुढची औषधे आधीच ठरवावी लागतात. त्याप्रमाणे या १२ ऐतिहासिक गंभीर पुस्तकांची समीक्षा वाचल्यावर वाचक गंभीर, विषण्ण, अभिमानी वगैरे झाला असेल. त्याच्यात वीरश्री, रणनीती, कपटीपणा वगैरेचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्याला लेखक हलक्या-फुलक्या हास्य-काव्य पुस्तकांच्या समीक्षेचा डोस देतो. वाचकाला असे ताजेतवाने केल्यावर हा डॉक्टर आपल्याला नद्या आणि भौगोलिक सफरीवर नेतो. मग आपण हिंदुस्तान, गंगा-यमुना, पाकिस्तान-अफगाणिस्तान-इराण फिरून दमलो की व्यक्तिचित्रांची ओळख करून देत प्रेरणा देतो. या उपचारांनी उत्साही झालो की, अलगद स्वतःचा व्यवसाय आणि लिखाण यांची सांगड घालणार्या डॉक्टर्सनी लिहिलेल्या वैद्यकी संदर्भातल्या पुस्तकांकडे प्रकरणांचा क्रम सरकतो. त्यात 'निसर्गाचे गोड गुपित: यौवनस्पर्श' या पुस्तकाचा विशेष उल्लेख करावा लागेल. खरे तर १९९० च्या आधी जन्मलेल्या मुलांना वाळत घातलेले स्त्रियांचे कपडेही दिसू नयेत इतकी काळजी घेतली जात असे. आता अंगावर कपडे दिसू नयेत असा काळ आला आहे. काळ बनून काळ येतोय त्याचवेळी नव्या पिढीची वाईट वेळ येऊ नये यासाठी लैंगिक शिक्षण आवश्यक झाले आहे. या विषयावरची पुस्तके आली पाहिजेत आणि वाचली गेली पाहिजेत, हेच लेखक इथे सुचवतो. साद आणि दाद या पुस्तकाला उमा कुलकर्णी यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांचे आत्मचरित्र, त्यांनी केलेली भाषांतरे यावरची लेखकाची समीक्षाही 'साद आणि दाद'ला व्यापून आहे. लेखकाचे मनोगत संत तुकारामांच्या ओव्यांनी सुरू होते. लेखक श्रेय देताना हातचे राखत नाही. मात्र, नंतर तो डॉक्टरी भूमिकेत शिरतो. त्याची मासलेवाईक उदाहरणे म्हणजे,'पुस्तके सहेतुकपणे निवडलेली नाहीत', 'माझ्याकडून नकारात्मक न लिहिले जाणे शक्य आहे', 'सारांशलेखन झाले असल्यास मूळ पुस्तक वाचण्याची गरज उरत नाही हे म्हणणे उद्धटपणाचे ठरेल' अशी वाक्ये देता येतील. 'साद आणि दाद' वाचल्यावर त्यातल्या ३७ मधली ७ ते ८ पुस्तके मुळातून वाचावी असे मला वाटले. लव्हेकरांनी केलेल्या विश्लेषण/समीक्षेच्या वाचकाला असे वाटणे हे निःसंशय त्या समीक्षेचे यश आहे. याचा अर्थ बाकी पुस्तके वाचू नयेत असे वाटले असा नाही. बाकी पुस्तके मी वाचलेली आहेत किंवा अन्य काही कारणाने ती समीक्षा वाचूनही माझ्या 'रडार'वर आली नाहीत. समीक्षा लिखाणातही काही पल्लेदार वाक्ये, लालित्यपूर्ण लिखाण करता येते याची चुणूक लेखकाने जागोजागी दाखवली आहे. 'गार्डन ऑफ फूल्स'च्या समीक्षेतले 'सर कॉटलींचे स्वप्न गंगेच्या प्रवाहप्रमाणेच त्यांनी बांधलेल्या कालव्यातून अखंड वाहते आहे'. 'नदी समुद्राला मिळण्याआधी तिचे पात्र आपोआप विस्तारत जात असते'. 'आधी सद्दाम हुसेन नंतर उद्दाम बुश'. 'सख्खे शेजारी सखे शेजारी नसतात'. 'बंगालला बंगाल का म्हणतात याचे गौडबंगाल उलगडले', अशी वाक्ये 'साद आणि दाद'चे वाचन रंगतदार करतात. काही अप्रचलित मराठी शब्द जे लुप्त होऊ शकतात असे वापरले आहेत. 'खरूज'सारखा शब्द उच्चारल्यावर जेन-झी, 'रोग नंतर-आधी शब्द आवर' असा चेहेरा करते. क्षयरोग, कुष्ठरोग, 'शाठ्याधारित, विस्मय, विहंगमावलोकन असे शब्द. कदाचित हे मुद्दामहून वापरले आहेत. ही सवय भाषारक्षणालाही मदत करेल. प्रत्येक पुस्तकाचे लव्हेकर यांनी पूर्ण वाचन केलेले आहे आणि त्यासंबंधी चवीने लिहिले आहे. मनोगतात सांगितल्याप्रमाणे गेल्या १५-२० वर्षांमधली पुस्तके यात घेतली आहेत. त्यामुळे बहुतेक लेखक, कमी वाचन असलेल्या पिढीला माहिती नसतील असे आहेत. मला यातला एकही लेखक आणि पुस्तक माहिती नसेल अशा दडपणाखाली मी पुस्तक वाचायला सुरुवात केली. पण पहिलेच पुस्तक सुशील अत्रे या माझ्या गाववाल्याचे तर दुसरे 'राजा कृष्णदेवराया' हे व्यंकटेश देवनपल्ली या माझ्या परिचित ज्येष्ठ लेखकांचे पाहून मला हायसे वाटले. नंतर अविनाश चिंचवडकर यांचे 'गुगलचे डोके ठिकाणावर आहे काय?' हेही समाविष्ट दिसले. गिरीश कुबेर तर प्रसिद्धच आहेत. देवनपल्ली, चिंचवडकर, लव्हेकर अशा सगळ्यांनी परप्रांतात राहूनही मराठीचा झेंडा हाती धरून डौलात फडकत ठेवला आहे. यासाठी कुठलेही रस्त्यावरचे आंदोलन न करता, भावना न भडकवता, शत्रुत्व निर्माण न करता. शांतपणे खोलीत बसून वाचून आणि लिहून. त्याला दाद देणे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. माझ्या मते समीक्षा ग्रंथ खुशाल विकत घ्यावेत आणि बाळगावेत. ते मूळ पुस्तके वाचायला हुरूप देतात. निवड करायला माहिती देतात. आणि एका अनुभवी आणि चतुरस्त्र वाचकाच्या नजरेतून धावती भेट घडवत त्या-त्या विषयाचा वेगळा दृष्टीकोन देतात. ' पुस्तके साद आणि दाद' जरूर संग्रही ठेवावे.
पुस्तकाचे नाव: पुस्तके साद आणि दाद
लेखक: डॉ. अनुराग लव्हेकर
प्रकाशक: भाग्यश्री प्रकाशन
प्रथमावृत्ती: २९ डिसेंबर २०२५
पृष्ठसंख्या: २२४
किंमत: ३५०
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel



Hi https://is.gd/9PLRLO