पुणे : व्याजाने घेतलेले पैसे 10 टक्के व्याजासहीत परत करुनही व्यावसायिकाकडे आणखी अडीच लाख रुपयांची मागणी करीत व्यावसायिकाची पिळवणूक करणाऱ्या खासगी सावकाराला पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकाने हि कारवाई केली. भरत बाबूलालजी उणेचा (वय 36, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या खासगी सावकाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बाळू पन्नालाल उणेचा (वय 38) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला व्यावसायिक कामानिमित्त पैशांची गरज होती.
त्यासाठी त्यांनी त्यांच्या ओळखीच्या भरत उणेचा याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर उणेचा याने बेकायदेशीरपणे खासगी सावकारी करीत मासिक 10 टक्के व्याजदराने फिर्यादीला पैसे दिले. त्यानुसार फिर्यादीने त्याच्याकडून दोन वर्षांपुर्वी तीन लाख रुपये 10 टक्के व्याजदराने घेतले होते. सुरक्षा ठेवेच्या स्वरुपात त्याने फिर्यादीकडून सही केलेले धनादेश, कोरे स्टॅम्प पॅड व इतर महत्वाची कागदपत्रे घेतली. तसेच त्यांच्यातील व्यवहाराबाबत कोऱ्या स्टॅम्प पेपरवर लिहूनही घेतले होते. दरम्यान, फिर्यादीने त्यास मुद्दल व व्याजाची रक्कम पुर्णपणे फेडली.
त्यानंतरही उणेचा हा फिर्यादीकडे आणखी अडीच लाख रुपयांची मागणी करु लागला. पैसे न दिल्यास समाजात तुझी बदनामी करतो, अशी धमकीही त्याने दिली. या प्रकाराला कंटाळल्याने फिर्यादीने याबाबत गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे तक्रार केली होती. चौकशीमधाये या प्रकरणामध्ये उणेचा याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, राजेंद्र पाटोळे, पोलिस कर्मचारी संजय जाधव, मोहसीन शेख, साधना ताम्हाणे यांच्या पथकाने उणेचा यास सापळा रचून अटक केली. पुढील कारवाईसाठी त्यास दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




