
पुणे : नवीन शैक्षणिक धोरणाचा दाखल देत विद्यापीठ अनुदान आयमेगाने (यूजीसी) पुण्यासह देशातील सात प्रादेशिक कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील पश्चिम प्रादेशिक कार्यालयाच्या अखत्यारित महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा ही राज्ये येत असल्यामुळे हे कार्यालय बंद झाल्यानंतर प्राध्यापक, प्राचार्य यांना महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या विविध यमेजनांसाठी आता थेट दिल्ली गाठावी लागणार आहे. त्यामुळे या निर्णयाला प्राध्यापक आणि प्राचार्याकडून जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. आयोगाचे मुख्यालय दिल्लीत आहे. जुन्या शैक्षणिक धोरणानुसार देशभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या सुविधेसाठी आयोगाने प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पुणे, हैदराबाद, भोपाळ, दिल्ली, गुवाहाटी, कोलकता आणि बेंगळुरु या ठिकाणी प्रादेशिक कार्यालये स्थापन केली होती. या कार्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य आणि महाविद्यालयांसाठी आयोगाच्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया प्रादेशिक कार्यालयांमार्फत करण्यात येते. त्यामुळे शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील प्राध्यापक-प्राचार्याना थेट दिल्लीला न जाताही प्रादेशिक कार्यालयांमार्फत प्रक्रिया करता येत होती. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैशांची बचत होत होती.
मात्र, आता प्रादेशिक कार्यालये बंद झाल्यामुळे प्रलंबित बाबींसाठी किंवा योजनांच्या पूर्ततेसाठी थेट दिल्लीला जावे लागणार आहे. त्याचा मनस्तापच अधिक होणार आहे. नवीन प्रादेशिक कार्यालये बंद करण्याची चर्चा वर्षभरापासून सुरू होती. आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीतही या संदर्भात चर्चा झाली. मात्र, अंतिम निर्णय झालेला नव्हता. त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे झालेल्या प्रादेशिक कार्यालयांच्या सहसचिवांच्या बैठकीत कार्यालये बंद करून ती यूजीसीच्या दिल्लीतील मुख्यालयामध्ये आणण्यात यावीत हा निर्णय घेण्यात आला होता. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १३ नोव्हेबर ही अंतिम मुदत देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत आयोगाशी संपर्क साधला असता प्रतिसाद देण्यात आला नाही.
देशातील महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या कार्यप्रणालीत सुसूत्रता येण्यासाठी आणि कारभार सुरळीत चालण्यासाठी आयोगाचे विकेंद्रीकरण आवश्यक आहे. त्यासाठीच देशातील विविध राज्यांत प्रादेशिक कार्यालये सुरू करण्यात आली होती. ही कार्यालये बंद झाल्यामुळे, प्राध्यापक आणि प्राचार्याची गैरसोय होणार असून, त्यांना संशोधन प्रकल्पांसाठी समस्या येणार आहेत. महाविद्यालये आणि विद्यापीठासाठी असणाऱ्या विविध अनुदान योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्ली गाठावी लागणार असून विद्यापीठांच्या प्रशासकीय कामांसाठी जादा वेळ आणि पैसा खर्च होणार आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्यासोबत प्रधानमंत्री व राष्ट्रपती यांच्याकडे पाठपुरावा करू.
शहर
- पुणे जिल्ह्यात निसर्गाचा कोप! चांदोली बुद्रुकमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाड पडून शेतकऱ्याचा मृत्यू!
- सांगली एसटी डेपोतील लज्जास्पद प्रकार; महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या क्लर्कचे निलंबन, गुन्हा दाखल!
- एसबीआय आरडी की पोस्ट ऑफिस आरडी? गुंतवणुकीसाठी काय जास्त फायदेशीर आहे? जाणून घ्या सविस्तर तुलना.
- दिल्लीत भीषण आगीचा थरार: मालवीय नगरमधील हॉटेलला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांच्या इमारतीवरून उड्या!
महाराष्ट्र
- पुणे जिल्ह्यात निसर्गाचा कोप! चांदोली बुद्रुकमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाड पडून शेतकऱ्याचा मृत्यू!
- सांगली एसटी डेपोतील लज्जास्पद प्रकार; महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या क्लर्कचे निलंबन, गुन्हा दाखल!
- एसबीआय आरडी की पोस्ट ऑफिस आरडी? गुंतवणुकीसाठी काय जास्त फायदेशीर आहे? जाणून घ्या सविस्तर तुलना.
- दिल्लीत भीषण आगीचा थरार: मालवीय नगरमधील हॉटेलला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांच्या इमारतीवरून उड्या!
गुन्हा
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
- उत्तराखंडमध्ये पर्यटनाचा थरार! नोएडाचा इंजिनिअर आणि रामनगरची तरुणी ट्रॅकिंगदरम्यान बेपत्ता; शोधमोहीम सुरू.
























Subscribe to my channel



