पुणे मेट्रो भविष्यात होणार अधिक वेगवान

पुणे - पुणे मेट्रोचे लोकार्पण होताच सफरीचा आनंद घेण्यासाठी सध्या पुणेकरांची एकच झुंबड उडाली आहे. वाहतूक कोंडीने त्रासलेल्या पुणेकरांना मेट्रोचा प्रवास आवडू लागला आहे. सध्या गरवारे महाविद्यालय ते वनाज या मार्गावर मेट्रो सुरु झाली आहे. सध्या मेट्रो ताशी ४० किलोमीटर वेगाने धावत आहे. त्यामुळे या मार्गावरील पाच किलोमीटर प्रवासासाठी सुमारे २० मिनिटांचा कालावधी लागत आहे. भविष्यात मेट्रो यापेक्षा अधिक वेगाने धावणार असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. याबाबत महामेट्रोचे अधिकारी म्हणाले, सध्या मेट्रोची ट्रायल सुरु असल्याने ताशी ४० किमी वेग आहे. तसेच शहरात सध्या मेट्रोच्या मार्गांचे कामही अपूर्ण असून एकच छोटा मार्ग सुरु आहे. डिझाईननुसार ८० किमी वेगाने मेट्रो धावू शकते. त्यामुळे अजून काही मार्ग सुरू होताच आहे, त्या वेगात बदल करण्यात येणार असल्याने पुणेकरांना मेट्रोने वेगवान प्रवास करता येणार आहे. ते म्हणाले, प्रवाशांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचीही संख्या अधिक आहे. सर्वांना या नवीन सेवेची सवय व्हावी, मेट्रो प्रवासाबद्दल विश्वास निर्माण व्हावा, आनंद लुटता यावा या हेतूने सध्या मेट्रो ताशी ४० किमी वेगाने धावते आहे. २,२७,९५० - आठ दिवसातील प्रवासी संख्या ३२ लाख रुपये - आतापर्यंतचे उत्पन्न प्रत्येकजण वाहतूक कोंडीने त्रासला आहे. पुण्यात जलद प्रवास पुणे मेट्रोने करता येणार आहे. नवीन गोष्टीची सवय होण्यास वेळ लागतो. मेट्रोच्या सर्व मार्गांचे काम पूर्ण होताच निश्चित वेग वाढवला जाईल, याची खात्री आहे. - अविनाश मोहिते, मेट्रो प्रवासी शहरात मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. सध्या एकच मार्ग असल्याने ४० किमी वेगाने मेट्रो धावत आहे. दैनंदिन प्रवासी वाढले आणि मार्ग सुरळीत झाला की नियोजनानुसार वेग वाढविला जाईल. डिझाईननुसार ८० किमी वेगाने मेट्रो धावू शकते. - हेमंत सोनवणे, महासंचालक, महामेट्रो.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply