पुणे : मावळातील नायगावात गोळीबार; वैमनस्यातून दोन गटात हाणामारी, तिघे जखमी

पुणे : लोणावळ्यातील मावळ तालुक्यातील नायगाव येथे सोमवारी सायंकाळी दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली; तसेच दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. हाणामारीत तिघे जण जखमी झाले.

याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. सोमनाथ उर्फ स्वामी गायकवाड आणि आकाश शंकर लालगुडे यांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. हाणामारी प्रकरणात दोन्ही गटांमधील आठ जणांना अटक करण्यात आली आहे. योगेश अनंता गायकवाड, प्रमोद सोपान सांडभोर, मंगेश भीमराव मोरे जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री नायगाव परिसरात नवनाथ चोपडे यांच्या घरासमोर वाद झाला. वादातून दोन्ही गटात हाणामारी झाली. दाेन्ही गटातील आरोपींनी दगडफेक केली तसेच कोयत्याने वार केले. दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला.

या घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने तपास सुरू केला. या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply