
लोणावळा : नववर्ष स्वागतासाठी लोणावळा, खंडाळा परिसरात पर्यटक दाखल झाले असून पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. नववर्ष पार्ट्यामधील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके तयार करण्यात आली असून हुल्लडबाजांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
लोणावळा परिसरात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी नाके उभे करण्यात आले आहे. पर्यटनस्थळ तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करुन गोंधळ घालणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. महिलांच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांचे पथक गस्त घालणार आहे. हुल्लडबाजांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी दिला. पर्यटकांची सुरक्षा तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. पर्यटक हाॅटेल आणि खासगी बंगल्यात वास्तव्य करतात. सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याबाबत बंगले मालकांची बैठक नुकतीच घेण्यात आली. पर्यटकांचे ओळखपत्र घेणे, त्यांची नोंद करणे तसेच हॉटेल आणि बंगल्यांच्या परिसराती सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंगले किंवा हॉटेलच्या आवारात काही गैरप्रकार घडल्यास कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक डुबल यांनी सांगितले.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटक, हॉटेल चालक तसेच बंगले मालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. लोणावळ्यातील व्यावसायिक, नागरिक, पर्यटकांनी काळजी घ्यावी. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पर्यटकांनी मुलांची काळजी घ्यावी. त्यांच्यावर लक्ष ठेवावे. नियमांचे पालन करुन सर्वांनी नववर्ष उत्साहात साजरे करावे. – सीताराम डुबल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणावळा शहर पोलीस ठाणे
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

