
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आणि महिला आरक्षण आज (शुक्रवारी, २९ जुलै) निश्चित केले जाणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण कायम ठेवून अन्य आरक्षणे नव्याने निश्चित केली जाणार असल्याने किमान सात ते आठ प्रभागातील दिग्गज आणि अनुभवी नगरसेवकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. आरक्षण सोडतीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) आरक्षणासाठी स्थापन केलेल्या जयंतकुमार बांठिया आयोगाच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्या होत्या. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ओबीसी आरक्षणासह होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण निश्चित करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करताना शुक्रवारी सोडत काढण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यासाठीची रंगीत तालीम गुरुवारी घेण्यात आली.
५८ प्रभाग असून त्यातून १७३ नगरसेवक निवडून येणार –
आगामी महापालिका निवडणुकीसाठी ५८ प्रभाग असून त्यातून १७३ नगरसेवक निवडून येणार आहेत. निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग (तीन नगरसेवकांचा एक प्रभाग) या पद्धतीने होणार असून निवडणुकीसाठी अ, ब, क असे तीन सदस्य संख्येचे ५७, तर दोन सदस्य संख्येचा एक असे एकूण ५८ प्रभाग आहेत. यापूर्वी ओबीसी आरक्षणाशिवाय निघालेल्या सोडतीमध्ये २३ जागा अनुसूचित जाती व दोन जागा अनुसूचित जमातीसाठी अशा एकूण २५ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. उर्वरित १४८ जागांमधून ओबीसी प्रवर्गाच्या ४६ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ५१ जागांवर आरक्षण शुक्रवारी निश्चित होईल.
२४ प्रभागांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींचे आरक्षण –
शहरातील ५८ प्रभागांपैकी २४ प्रभागांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींचे आरक्षण आहे. त्यामुळे ३४ प्रभागातील अ क्रमांकाची जागा ओबीसी सर्वसाधारण गटासाठी आरक्षित केली जाईल. ओबीसींच्या ४६ जागांपैकी उर्वरित बारा जागा अनुसूचित जाती आणि जमातीचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. त्यामुळे या आरक्षित प्रभागातील ब क्रमांकाच्या जागेवर सोडत काढली जाईल. संबंधित प्रभागात अनुसूचित जाती किंवा जमातीचे सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण असेल तर अशा प्रभागात ब क्रमांकाची जागा आपोआप ओबीसी महिलांसाठी आरक्षित होईल. तर ‘अ’ जागा अनुसूचित जाती किंवा जमातीच्या महिलांसाठी आरक्षित असेल तर तेथील ‘ब’ जागा ओबीसी सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होईल. एकूण ४६ पैकी २३ जागा सर्वसाधारण गटासाठी आणि २३ जागा महिलांसाठी आरक्षित केल्या जातील.
… त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण निश्चित होणार –
ओबीसींच्या आरक्षणाची प्रक्रिया संपल्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण निश्चित केले जाईल. शहरातील ५८ पैकी ज्या २२ प्रभागात कोणत्याही प्रवर्गातील महिलांसाठी जागा आरक्षित नाही, अशा प्रभागात सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी एक जागा थेट देण्यात येणार आहे. तर ज्या प्रभागात तीन पैकी दोन जागांवर कोणतेही आरक्षण पडलेले नाही अशा प्रभागातील ब क्रमांकाच्या जागेवर सर्वसाधारण महिलेचे आरक्षण निश्चित केले जाईल. या पद्धतीने एकूण २२ ते २३ जागा निश्चित केल्या जातील.
दिग्गजांना धक्का –
ओबीसी आणि महिला आरक्षणासाठी नव्याने सोडत निश्चित होणार असल्याने निवडणुकीची समीकरणे पुन्हा बदलणार आहेत. काही प्रभागात दिग्गज नगरसेवकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कोणत्या प्रभागात ओबीसीचे आरक्षण पडणार आणि कोणत्या जागेवर महिलांसाठीचे आरक्षण निश्चित होणार,हे जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र खऱ्या अर्थाने स्पष्ट होणार आहे.
शहर
- सांगली एसटी डेपोतील लज्जास्पद प्रकार; महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या क्लर्कचे निलंबन, गुन्हा दाखल!
- एसबीआय आरडी की पोस्ट ऑफिस आरडी? गुंतवणुकीसाठी काय जास्त फायदेशीर आहे? जाणून घ्या सविस्तर तुलना.
- दिल्लीत भीषण आगीचा थरार: मालवीय नगरमधील हॉटेलला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांच्या इमारतीवरून उड्या!
- मेळघाटात भीतीचे सावट! चार महिलांचा बळी घेणारी नरभक्षक वाघीण परतवाड्यात; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण!
महाराष्ट्र
- सांगली एसटी डेपोतील लज्जास्पद प्रकार; महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या क्लर्कचे निलंबन, गुन्हा दाखल!
- एसबीआय आरडी की पोस्ट ऑफिस आरडी? गुंतवणुकीसाठी काय जास्त फायदेशीर आहे? जाणून घ्या सविस्तर तुलना.
- दिल्लीत भीषण आगीचा थरार: मालवीय नगरमधील हॉटेलला लागलेल्या आगीत २१ जणांचा मृत्यू; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांच्या इमारतीवरून उड्या!
- मेळघाटात भीतीचे सावट! चार महिलांचा बळी घेणारी नरभक्षक वाघीण परतवाड्यात; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण!
गुन्हा
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
- उत्तराखंडमध्ये पर्यटनाचा थरार! नोएडाचा इंजिनिअर आणि रामनगरची तरुणी ट्रॅकिंगदरम्यान बेपत्ता; शोधमोहीम सुरू.

























Subscribe to my channel



