पुणे : करोनामुळे रखडलेल्या बारामती-फलटण-लोणंद रेल्वे मार्गाच्या कामाला आता वेग आला आहे. या मार्गातील बारामती ते फलटण या मार्गात असलेल्या १३ गावांतील जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगाने केली जात असून जूनअखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. भूसंपादनाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी या कामाचा दररोज आढावा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
या रेल्वेमार्गापैकी फलटण ते लोणंद या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, बारामती ते फलटण या मार्गातील भूसंपादनाचे काम अद्याप अपूर्ण आहे. या मार्गातील लाटे व माळवाडी या दोन गावांमधील भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १३ गावांतील भूसंपादनाचे काम वेगाने होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘बारामती ते फलटण रेल्वेमार्ग ३७.२० किलोमीटर लांबीचा आहे. त्यामध्ये १५ गावांतील जमिनी ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. दोन गावांतील भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित गावांतील भूसंपादन जून महिन्याअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादनाचा आढावा दररोज सायंकाळी साडेसहा वाजता दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात येत आहे.’
दरम्यान, या रेल्वेमार्गासाठी १८३ हेक्टर जमीन ताब्यात घ्यावी लागणार आहे. वाटाघाटीने भूसंपादन केले जाणार असून जमिनीची मोजणी आणि मूल्यांकनाचे प्रस्ताव वेगाने करण्यात येणार आहेत. भूसंपादन करताना निधीची कमतरता भासणार नाही. रेल्वे विभागाकडून ११५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यापैकी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. त्यामुळे जमीनमालकांना ताबडतोब मोबदला दिला जाणार आहे, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.
प्रकल्पाचा आढावा
- बारामती ते लोणंद मार्गाची लांबी ६३.६५ किलोमीटर
- फलटण ते लोणंद मार्गाचे काम पूर्ण ३७.२० किलोमीटर
- बारामती ते फलटण मार्ग
- बारामती ते फलटण मार्गातील दोन गावांतील भूसंपादन पूर्ण १३ गावांतील भूसंपादनासाठी दररोज आढावा बैठक
बारामती ते फलटण या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी दररोज दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेण्यात येत आहे. जूनअखेर भूसंपादनाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. भूसंपादनासाठी ५० कोटी रुपयांचा निधी शिल्लक असल्याने निधीची कमतरता भासणार नाही. त्यामुळे प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
शहर
- पुण्यातील राजगड परिसरात मध्यरात्री गोळीबाराचे तांडव; श्रीनाथ हॉटेलवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात दोघे गंभीर जखमी
- पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई! ब्युटीपार्लरच्या आमिषाने आणलेल्या ६ बांगलादेशी महिलांना अटक; देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश
- छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळू माफियांचा थरार! गोदावरी पात्रात बेकायदेशीर उपशाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर थेट गोळीबार
- पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! बकरी ईद आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी
महाराष्ट्र
- पुण्यातील राजगड परिसरात मध्यरात्री गोळीबाराचे तांडव; श्रीनाथ हॉटेलवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात दोघे गंभीर जखमी
- पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई! ब्युटीपार्लरच्या आमिषाने आणलेल्या ६ बांगलादेशी महिलांना अटक; देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश
- अमरावतीत उन्हाचा हाहाकार! पारा थेट ४७ अंशांवर पोहोचल्याने २ दिवसांत ३ जणांचा उष्माघाताने मृत्यू; प्रशासनाचा रेड अलर्ट
- शेतकऱ्याच्या घामाची क्रूर चेष्टा! बीडमध्ये कांदा विकून हाती काहीच नाही, उलट वाहतूक भाड्यासाठी खिशातूनच द्यावे लागले ३०१ रुपये; बळिराजाच्या डोळ्यांत पाणी
गुन्हा
- पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई! ब्युटीपार्लरच्या आमिषाने आणलेल्या ६ बांगलादेशी महिलांना अटक; देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश
- छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळू माफियांचा थरार! गोदावरी पात्रात बेकायदेशीर उपशाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर थेट गोळीबार
- टेलिग्रामवर 'नीट' पेपरचा उघड लिलाव! एका पेपरसाठी १० लाख; करोडोंच्या NEET UG पेपरफुटी घोटाळ्याचा मोठा पर्दाफाश
- अंबाला हादरले! जमीन आणि पैशांच्या वादातून घरात रक्ताचा सडा; २४ वर्षीय तरुणानं सख्खा भाऊ, आजी अन् काकाची गोळ्या झाडून केली हत्या
राजकीय
- महायुतीत महामंडळ वाटपाचा तिढा सुटणार! लाल दिव्याच्या गाड्या आणि पदांचे वाटप अंतिम टप्प्यात; लवकरच होणार घोषणा!
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
इतर
- शेतकऱ्याच्या घामाची क्रूर चेष्टा! बीडमध्ये कांदा विकून हाती काहीच नाही, उलट वाहतूक भाड्यासाठी खिशातूनच द्यावे लागले ३०१ रुपये; बळिराजाच्या डोळ्यांत पाणी
- आजचे राशिभविष्य २५ मे २०२६: महादेवाची कृपा कोणावर होणार आणि कोणाला खर्चावर ठेवावा लागणार ताबा? जाणून घ्या सर्व १२ राशींचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य २४ मे २०२६: सूर्य-बुधाचा बुधादित्य योग पालटणार या ४ राशींचे भाग्य; तुमच्या राशीत धनलाभाचे योग आहेत का?
- आजचे राशीभविष्य (२३ मे २०२६): 'या' राशींची नोकरी-व्यवसायात होणार प्रगती; अविवाहितांचे जुळणार लग्न!
मनोरंजन
- आयपीएल २०२६ मध्ये युवा वादळ! 'ऑरेंज कॅप'धारक वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी टीनेजर फलंदाज!
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- न्यूयॉर्कमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; बसमधून खाली उतरताच अचानक आलेल्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली महिला, भीषण व्हिडिओ व्हायरल
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट उघड! इवांका ट्रम्प यांच्यावर हल्ल्याची तयारी करणारा आयआरजीसीचा दहशतवादी अटकेत
- भारत-अमेरिका संबंधात नवा अध्याय! अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारतात; पीएम मोदींसोबतच्या बैठकीत कोणता महत्त्वाचा करार होणार?
- सर्वसामान्यांना सलग झटके! १० दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले; इंधनाचा भडका, पाहा नवे दर!





















Subscribe to my channel





खूपच छान