
पुणे: घटनेचे वार्तांकन करण्याचे कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकाराला अटक करण्याची मागणी करणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी मूक निदर्शने करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांना सुबुद्धी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, रवींद्र माळवदकर, बंडू तांबे, कार्तिक साठे, नीता कुलकर्णी, बाळासाहेब आहेर यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून संस्था उभ्या केल्या, असे अवमानकारक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटले. समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली. या घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पालकंमत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. पाटील यांच्या मागणीनंतर संबंधित पत्रकाराला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
राज्याच्या एका मंत्र्याने पोलिसांवर दबाव आणल्याचा प्रकार चुकीचा आहे. पत्रकारांवर दडपशाही करून आपल्या विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजपच्या या फासिस्ट विचारांमुळे पुढील काळात पत्रकारांना निरपेक्ष वार्तांकन करतानाही दबाव सहन करावा लागेल. पत्रकारांना बळ देऊन लोकशाहीच्या चौथ्या खांबाचे स्वातंत्र्य अबाधित रहावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कायम प्रयत्नशील आहे, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
शहर
- टाटा मोटर्सचा ईव्ही मार्केटमध्ये धमाका: सफारी आणि सिएरा आता 'इलेक्ट्रिक' अवतारात; ६०० किमीची जबरदस्त रेंज मिळणार!
- ८२ व्या वर्षीही तरुणांना लाजवणारे आरोग्य! ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; आजवर औषधाशिवाय ठणठणीत!
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
महाराष्ट्र
- टाटा मोटर्सचा ईव्ही मार्केटमध्ये धमाका: सफारी आणि सिएरा आता 'इलेक्ट्रिक' अवतारात; ६०० किमीची जबरदस्त रेंज मिळणार!
- ८२ व्या वर्षीही तरुणांना लाजवणारे आरोग्य! ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; आजवर औषधाशिवाय ठणठणीत!
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
गुन्हा
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; सांगलीत १४ फेसबुक युजर्सवर गुन्हा दाखल!
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
























Subscribe to my channel



