पुणे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे एकावर कोयत्याने वार

पुणे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे एकावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना बुधवारी (११ मे) दुपारी साडेबाराच्या सुमारास फुरसुंगीतील तरवडे वस्तीवर घडली. याप्रकरणी सोमनाथ कामठे (वय ४२, रा. तरवडे वस्ती ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ हे घरी असताना आरोपी त्यांच्याकडे गेला. तू मला दारू पिण्यासाठी पैसे दे, अशी मागणी त्याने केली. मात्र, सोमनाथने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्यामुळे आरोपीने त्यांना शिवीगाळ करून कोयत्याने कपाळावर वार करून जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खळदे तपास करीत आहेत.


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *