पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपूल दोन ऑक्टोबरला रात्री दोन वाजता पाडणार ; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची माहिती

पुणे : चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्याचा मुहूर्त निश्चित झाला असून, दोन ऑक्टोबरला रात्री दोन वाजता हा उड्डाणपूल जमीनदोस्त केला जाणार आहे. त्यासाठी उड्डाणपुलापासून २०० मीटरचा परिसर हा निमर्नुष्य केला जाणार आहे.

नोएडा येथील ‘ट्वीन टॉवर’ ही बेकायदा इमारत पाडण्यासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाचा वापर हा उड्डाणपूल पाडण्यासाठी केला जाणार असून, त्यासाठी पुलाला १३०० छिद्रे पाडण्यात आली आहेत. ६०० किलो स्फोटकांद्वारे हा उड्डाणपूल पाडला जाणार आहे.हा उड्डाणपूल पाडण्याचे नियोजन करण्यासाठी संबधित सर्व विभागांतील अधिकाऱ्यांबरोबर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ते म्हणाले की, चांदणी चौकातील उड्डाणपूल हा दोन ऑक्टोबरला रात्री दोन वाजता पाडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित सर्व विभागातील अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन नियोजन करण्यात आले आहे. एक ऑक्टोबरला रात्री अकरा वाजल्यापासून ते दोन ऑक्टोबरला सकाळी आठपर्यंत या मार्गातील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply