Mumbai Goregaon Fire:  गोरेगाव फिल्मसिटीत TV मालिकेच्या सेटला भीषण आग! काही कलाकार अडकल्याची भीती

Mumbai Goregaon Fire: मुंबईतून एक मोठी बातमी समोर यते आहे. गोरेगाव फिल्मसीटीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. फिल्म सिटीमधील टीव्ही मालिकेच्या सेटवर ही आग लागल्याची माहिती आहे. गोरेगाव पुर्वेकडील एकूण चार स्टुडिओ आगीत पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. संध्याकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान ही आग लागली.

मिळालेल्या माहितीनुसार गुम है किसी के प्यार में आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या दोन मालिकांच्या सेटला आग लागून दोन्ही सेट जळून खाक झाले आहेत. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र स्टुडिओ पूर्णपणे जळाल्याने निर्मात्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. 

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीतून काही कलाकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. 

 


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *