
पुणे : गणेश विसर्जनासाठी महापालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील मध्यभागातील मिरवणूक मार्गांसह विविध भागांत सार्वजनिक स्वच्छता, औषधोपचाराची व्यवस्था, निर्माल्य कलश, विसर्जन हौद, फिरती स्वच्छतागृहे आदी तयारी पूर्ण करण्यात आली आहे.गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली नव्हती. त्यामुळे यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा होऊन गणेशाला निरोप देण्याचे वेध लागले आहेत. महापालिकेच्या घनकचरा विभागाने मिरवणूक संपताच पुढच्या तीन-चार तासात शहर स्वच्छ करण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. तसेच विसर्जनाच्या काळात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी नदीकाठी अग्निशामक दलाची यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. डेक्कन जिमखाना, पुणे व नुतन मराठी विद्यालयाजवळ, लक्ष्मी रस्ता या ठिकाणी मिरवणूक संपेपर्यंत वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे.
विसर्जन मिरवणुकीत शहरात खाद्यपदार्थ विक्री, खेळण्यांसह इतर साहित्य विक्रीचे स्टॉल लागलेले असतात. त्यामुळे मध्यभागातील सर्वच रस्त्यांवर कचरा पडलेला असतो. महापालिकेने मध्यवर्ती भागासाठी १३०० कर्मचारी, आदर पूनावाला फाउंडेशन, जनवाणी यासह इतर संस्था स्वच्छतेच्या कामामध्ये असणार आहेत. याच भागात २१० फिरती स्वच्छतागृहे असणार आहेत. ७७०० स्वच्छता कर्मचारी तैनात असणार असून ज्या भागातील गणेश विसर्जन मिरवणूक जसजशी पुढे जाईल तसे लगेच स्वच्छतेचे काम सुरू होणार आहे.
अग्निशामक दलाचे २०० कर्मचारी
विसर्जन करताना नदीपात्राशेजारील घाटावर दुर्घटना घडू नये यासाठी १५० जीवरक्षक, १५ अधिकारी, २० जवान यासह २०० कर्मचारी १५ घाटांवर नियुक्त आहेत. मुसळधार पाऊस पडून नदीला पूर आल्यास व दुर्घटना घडल्यास लगेच मदतकार्य करण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक घाटावर सुरक्षेसाठी दोरी बांधलेली आहे, तसेच नदीमध्ये डेक्कन व पेठांच्या परिसरात तीन चार ठिकाणी दोर बांधली आहे. होडी, ट्यूबही ठेवण्यात आल्या आहेत.
प्रशासकांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात नको
गणेश विसर्जन मिरवणूक या वर्षी पुण्याचे प्रथम नागरिक, महापौर यांच्या अनुपस्थित होते. दरवर्षी महापौरांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात कसबा गणपतीच्या श्री गणेशाची आरती करून सुरू होते. मात्र महापालिकेवर प्रशासक असल्याने प्रशासक तथा आयुक्त विक्रमकुमार यांच्या हस्ते आरती करण्यात येणार आहे. मात्र माजी महापौर अंकुश काकडे यांनी वेगळा पर्याय सुचवला आहे. महापौर नसल्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे, खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते श्री गणेशाला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात यावी, अशी सूचना काकडे यांनी केली.
शहर
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
महाराष्ट्र
- जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
गुन्हा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला


























Subscribe to my channel

