
नवी दिल्ली : शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या हक्कासंदर्भात आदेश देण्यास नकार देत न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने बुधवारी ही सुनावणी २७ सप्टेंबपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे २० दिवसांनी होणाऱ्या या सुनावणीपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेता येणार नाही.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या उद्धव गटाला २३ सप्टेंबपर्यंत निवडणूक चिन्हांच्या हक्कांसंदर्भात भूमिका मांडण्यासाठी मुदत दिली होती. या मुदतीत उद्धव गटाला संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील आणि युक्तिवाद करावा लागेल. आयोगापुढे उद्धव गटाला आपले म्हणणे मांडता येणार असले तरी, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी २७ सप्टेंबर रोजी असल्याने उर्वरित चार दिवसांमध्ये आयोगाला ठोस आदेश काढता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर निवडणूक आयोग चिन्हाच्या हक्कासंदर्भात आदेश देऊ शकेल. त्यामुळे २७ सप्टेंबरनंतर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होण्याची शक्यता असून, शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटांना युक्तिवाद करून निवडणूक चिन्हावर आपलाच हक्क असल्याचे पटवून द्यावे लागेल.
राज्यात आगामी काळात मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याने निवडणूक चिन्हावर शिंदे गटाचा अधिकार की, उद्धव गटाचा हे निश्चित करावे लागणार आहे. मूळ शिवसेना आपलीच असल्याने धनुष्य-बाण या निवडणूक चिन्हावर आपलाच अधिकार असल्याचा दावा शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला आहे. मात्र, निवृत्त सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी २३ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीमध्ये निवडणूक आयोगाने ठोस निर्णय घेऊ नयेत, असे तोंडी आदेश दिले होते. त्यासंदर्भात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज करून निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवण्याची विनंती केली होती. या मुद्दय़ावर बुधवारी न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी झाली.
न्या. चंद्रचूड यांनीही बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये निवडणूक आयोगाला कोणताही आदेश दिले नाहीत आणि यासंदर्भात २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये निर्णय दिला जाईल, असे स्पष्ट केले. शिंदे गटाच्या वतीने वकील नीरज कौल यांनी, निवडणूक आयोगाची सुनावणी आणि न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाचा एकमेकांशी थेट संबंध नसल्याचा युक्तिवाद केला. केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्हांसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. त्यावर, यापूर्वी तीन सदस्यांच्या पीठाने यासंदर्भात लेखी आदेश दिला आहे का, अशी विचारणा न्या. चंद्रचूड यांनी केली.
शिंदे गटाने मंगळवारी केलेल्या अर्जानंतर तातडीने हालचाली होऊन लगेचच न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. एस. नरसिंह या पाच सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्यात आले. तातडीचा मुद्दा म्हणून निवडणूक आयोगाच्या अधिकारासंदर्भात बुधवारी घटनापीठासमोर सुनावणी झाली. मात्र, राज्यातील सत्तांतर नाटय़ सुरू असताना जुलैमध्ये शिंदे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेसह सहा याचिकांवरील सुनावणीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.
सर्व याचिकांवर कालबद्ध सुनावणी?
राज्यातील सत्तासंघर्षांबाबत सर्वोच्च न्यायालयात सहा याचिका प्रलंबित आहेत. पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात संविधानातील ‘परिशिष्ट दहा’ तसेच, विधानसभेतील पीठासीन अधिकाऱ्यांविरोधात अविश्वास ठराव आणला असताना त्यांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे का, असे १० मुद्दे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये उपस्थित झाले होते. या प्रश्नांचा संविधानाच्या दृष्टीने अर्थ लावण्यासाठी घटनापीठाची स्थापना करण्यात आली आह़े या सर्व मुद्दय़ांवर कालबद्ध सुनावणीबाबत २७ सप्टेंबरला निर्णय घेण्याचे संकेत न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले.
शहर
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- नाशिकमध्ये ५० ई-बसेसची प्रतीक्षा! केंद्र व राज्याकडून कराराचा मसुदा प्रलंबित; वर्षभरापासून बसेस वेटिंगवर
महाराष्ट्र
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- पुणेकर कुटुंबावर काळाचा घाला! कोल्हापुराजवळ भीषण अपघात; आईसह दोन निष्पाप चिमुकल्यांचा जागीच दुर्दैवी अंत
गुन्हा
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
- बिहार हादरलं! शिक्षकाच्या कृत्याविरोधात आवाज उठवणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला अमानुष छळवणूक; शाळेकडून बळजबरीने थामवला दाखला (TC)
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम





















Subscribe to my channel




