पुणे : खडकवासला धरणातून ९४१६ क्युसेकने विसर्ग

खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज दुपारी २ दरम्यान खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये साधारण ९ हजार ४१६ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये.

नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प सहाय्यक अभियंता यो.स.भंडलकर यांनी सांगितले.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेला मुसळधार पाऊस गुरुवारी सकाळपर्यंत कायम होता. त्यामुळे पानशेत धरण १०० टक्के भरले असून या धरणातून खडकवासला धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply