पुणे : केशवनगरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त सेवा सप्ताह

मुंढवा: भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस संदीप लोणकर यांनी १ एप्रिल ते ७ एप्रिलदरम्यान सेवा सप्ताहाचे आयोजन केले होते. त्यात शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळावा व श्री छत्रपती संभाजी महाराजजयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम, हिंदू नववर्षानिमित्त केशवनगर परिसरात शोभायात्रेचे आयोजन, केशवनगर येथील विविध सोसायट्यांच्या प्रवेशव्दार, मंदिरे, व सार्वजनिक ठिकाणी पाणपोईची सुविधा, पश्चिम महाराष्ट्र संघटक रवि अनासपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त काश्मिर फाईल्स या चित्रपटाचे सर्व कार्यकर्ते व नागरिकांसाठी बुकींग, सरचिटणीस संदीप लोणकर यांच्या वाढदिवसानिमित्त भारत सरकारच्या विविध योजनांचे पाच हजार लाभार्थ्यांना कार्ड वाटप, मोफत आधारकार्ड व सुकन्या योजनेचा शुभारंभ, प्रभागातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेकडे घरसंपर्क अभियान व मिठाई वाटप कार्यक्रम, स्वामी समर्थ मंदिरास एक लाख एक हजार रूपयांचा धनादेश सुपुर्द, जागतिक आरोग्य दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी ओबीसेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, सरचिटणीस गणेश घोष, संदीप दळवी, रवि तुपे, भुषण तुपे, गणेश घुले, प्रशांत हरसुले, शशिकांत कुलकर्णी,चेद्रकांत पोटे, धनंजय जाधव, राहुल शेवाळे, स्वप्नील उंद्रे, महेश पुंडे, महेश पुंडे, निहाल घोडके, संतोष घाडगे व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply