पुणे - कच्च्या मालाच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याने बांधकाम व्यवसायिकांसमोरील (Builder) संकट अधिक गहिरे होत आहे. सुमारे ४० टक्के विकसकांनी अशा परिस्थितीत तग धरून राहण्याविषयी साशंकता व्यक्त केली आहे. तसेच चालू प्रकल्प ठरलेल्या मुदतीत पूर्ण करण्यास विलंब होऊ शकतो, अशी भीती ४६ टक्के विकसकांनी व्यक्त केली आहे.
‘क्रेडाई’चा ‘इम्पॅक्ट ॲनॅलिसिस रिपोर्ट’
कोरोनाचा बांधकाम क्षेत्रावर झालेल्या परिमाणाचा आढावा घेण्यासाठी ‘क्रेडाई’ने तयार केलेल्या ‘इम्पॅक्ट ॲनॅलिसिस रिपोर्ट’मध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे. देशभरातील एक हजार ८५० विकसकांनी या अहवालात बांधकाम क्षेत्राच्या येत्या काळाविषयी अंदाज मांडणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बांधकाम खर्चामध्येही २० टक्क्यांची वाढ होणार आहे, अशी वाढ झाल्यास मालमत्तांच्या किमतींमध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ होईल, असे भाकीत ७८ टक्के विकसकांनी व्यक्त केले आहे.
रिपोर्टमधील महत्त्वाचे मुद्दे
- काही प्रकारच्या कच्च्या मालांच्या किमती जवळजवळ ११५ टक्क्यांनी वाढल्या
- पोत्यामागे सिमेंट १०० रुपयांनी महाग झाले
- कच्च्या मालाच्या किमतींमध्ये सरासरी ४० टक्के वाढ
- वाढत्या किमतींमुळे कच्चा माल मागविणे अनेकांनी बंद केले
- अहवालाचा कालावधी - २९ मार्च ते ११ एप्रिल २०२२
- एक हजार ८५० विकसकांनी सहभाग घेतला
-
दृष्टिक्षेपात विकसकांचे मत - टक्केवारी (टक्क्यांत)
- बांधकाम प्रकल्प बंद करणे भाग पडले : ६६
- किमती कमी झाल्या नाही तर सहा महिन्यांहून अधिक काळ काम सुरू ठेवता येणार नाही : ७६
- मालमत्तांच्या किमतींमध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ होईल : ७८
- बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे घरांच्या किमती वाढतील : ७६
विकसकांच्या सरकारकडून अपेक्षा
- बांधकाम साहित्याच्या किमतींवर सरकारने नियंत्रण ठेवावे
- बांधकाम साहित्यावरील जीएसटी इनपुट क्रेडिट
- मुद्रांक शुल्कात सवलत देवून ग्राहकांना खरेदीसाठी प्रोत्साहन द्यावे
- वास्तू खरेदीसाठीचा व्याजदर कमी करावा
कोरोनानंतर बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी विकासक गेल्या वर्षभरापासून बांधकाम खर्चात झालेली वाढ सोसत आहेत. मात्र खर्च आणि विक्रीमूल्यात अत्यंत कमी तफावत उरल्याने हळूहळू या खर्चाचा भार ग्राहकांवर पडणार आहे. रिअल इस्टेट उद्योगक्षेत्रासाठीची शिखर संस्था या नात्याने आम्ही संबंधित मंत्रालयाशी संवाद साधत आहोत व घर खरेदी करणाऱ्यांना त्यांचे घर ताब्यात मिळण्यास विलंब होऊ नये, ठप्प झालेले प्रकल्प पुन्हा जोमाने सुरू व्हावेत आणि या उद्योगक्षेत्राशी संबंधित २५१ पूरक व्यवसायांमध्ये कार्यरत कामगारांच्या नोकऱ्या जाऊ नयेत यासाठी सरकारने आवश्यक तो हस्तक्षेप करावा, अशी मागणी करत आहोत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- आखाती युद्धामुळे भारतासमोरील आव्हाने: नागरिक सुरक्षा, आर्थिक संबंध आणि धोरणात्मक निर्णय
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


