पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आत ईश्वराची अनुभूती असल्यास‎ त्यात कामना येऊ शकत नाही

कामनेची निर्मिती आतून होत नाही. आतून तर फक्त ती पूर्ण करण्याचे‎प्रयत्न होतात. कामना बाहेरून आत कशी येते ते पाहा. एखादा सुंदर‎चेहरा दिसला आणि तो मनात घर करतो. कोणाची छान गाडी पाहिली,‎ती मनात बसते आणि कामना निर्माण होते. मग आत तिची निर्मिती सुरू‎होते. आपण बाहेरून साधने मनात भरत राहतो, त्यातूनच कामना बनते.‎त्यामुळे हे भरणे आधी थांबवा. कारण एकदा का आत तिची निर्मिती‎झाली, की ती कुठे ना कुठे बाहेर पडणारच. कामना प्रकट होणारच. ती‎दाबून ठेवल्यास इतर अनेक आजार मागे लागतील. वस्तू किंवा व्यक्ती‎मनात प्रवेश करतात. तेव्हा मनाचे जाते त्याला दळू लागते आणि त्यातून‎कामनेची निर्मिती होते. मग ही कामना पूर्ण करण्यासाठी माणूस काय‎काय करत नाही! म्हणूनच एखादा चेहरा किंवा वस्तू पाहतो तेव्हा एक‎जाणीव ठेवा, की ही बाहेरची गोष्ट आहे . ती बाहेरच राहिलेली बरी. मी‎तिला मनात का आणू? पण मन आतून रिकामे असेल तर बाहेरच्या‎गोष्टी पटकन आत शिरतात. म्हणूनच मन आतून ईश्वराने भरा.‎परमात्म्याची अनुभूती व नामाचा जप मनात भरलेला असेल, तर‎बाहेरची साधने आत येऊन कामना निर्माण करू शकणार नाहीत.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *