नाशिक : पुराच्या पाण्यात उडी मारणारा तरुण बेपत्ता, धाडस पडले महागात

नाशिक : राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. तर काही ठिकाणी नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. मालेगावमधील गिरणा नदीलाही पूर आला आहे. असे असताना पुराच्या पाण्यात उडी मारणारा तरुण बेपत्ता झाला आहे. त्याने पुलावरुन गिरणा नदीत उडी मारली होती.

 पोहोण्यासाठी पुराच्या पाण्यात उडी घेऊन नुसतं धाडस करण तरुणाला चांगलेच महागात पडल्याची घटना मालेगावात समोर आली आहे. मुसळधार पावसाने गिरणा नदीला पूर आला आहे.  गिरणा पुलावरुन जवळपास 25 फूट उंचावरुन नईम मोहम्मद अमीन या किल्ला भागात राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणाने पोहोण्यासाठी उडी मारून स्टंट केला. 

पुराच्या पाण्यात उडी मारणारा तरुण वरती आलाच नाही. काल सायंकाळपासून हा तरुण गायब असून मालेगावच्या अग्निशमन दलाकडून त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान मालेगावच्या ठिकाणी असलेल्या पुराच्या पाण्यात अनेक पोहण्याचे धाडस करतात प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *