किरकटवाडी - सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरात पालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम विभागाने संयुक्तपणे धडक कारवाई करत मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणारी अतिक्रमणे जेसीबी मशीनच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. दरम्यान कारवाईतून जेवढे वाचवता येईल तेवढे साहित्य वाचविण्यासाठी व्यावसायिकांची धावपळ सुरू होती तर पालिकेच्या वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिक मात्र वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले होते.
अतिक्रमण व बांधकाम विभागाने संयुक्तपणे केलेल्या सदर कारवाईत दुकांच्या पुढे बांधण्यात आलेले अनधिकृत पत्रा शेड, टपऱ्या, नामफलक व इतर अतिक्रमणे हटविण्यात आली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. नांदेड फाट्याजवळ अगोदरच रस्ता अरुंद असल्याने व त्यातच पालिकेची वाहने रस्त्यात उभी असल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने वाहनचालक व प्रवासी संताप व्यक्त करताना दिसत होते.
कारवाई सुरू असताना पालिकेच्या अतिक्रमण विभागातील निरीक्षक धम्मानंद गायकवाड, बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता निशिकांत छापेकर, धनंजय खोले व इतर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता.
नांदेड फाट्याजवळ सुरू असलेली अतिक्रमण कारवाई व पालिकेचा फौजफाटा पाहून किरकटवाडी फाटा व खडकवासला गावात व्यावसायिकांची पळापळ सुरू झालेली दिसली. भाजी विक्रेते व टपरी धारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती. पालिकेकडून पत्रे,टपऱ्या यांची मोडतोड करण्यात येत असल्याने व्यावसायिक आपले साहित्य वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.
अतिक्रमण निरिक्षक धम्मानंद गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड फाट्यापासून पुढे खडकवासल्यापर्यंत रस्त्याच्या कडेने असलेली अनधिकृत बांधकामे व आतिक्रमणांवर येत्या काही दिवसांत कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईतून कोणालाही सूट मिळणार नाही असेही गायकवाड यांनी सांगितले.
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!























Subscribe to my channel



